दरम्यान, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होतीये. ही पोस्ट चर्चेत आहे कारण या पोस्टवर सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट हिने कमेंट केलीये. अन् त्या कमेंटवर नवविवाहित दाम्पत्याने देखील रिप्लाय केलाय. लग्नानंतर, कियारा आणि सिद्धार्थला सगळेच जण शुभेच्छा देतायत. त्यांच्या शुभेच्छांसाठी नवविवाहित दाम्पत्य त्यांचे आभार मानतायेत. दरम्यान, आलियाच्या पोस्टवर कियारा-सिद्धार्थने खास रिप्लाय देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
आलिया सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक दिवस बातम्या होत्या. करण जोहरच्या शोमध्ये सिद्धार्थने आलियासोबतच्या नात्याची कबुलीही दिली होती. “आलिया काही महिन्यांसाठी माझ्या आयुष्यात होती. पण…..” असं सांगतानाच त्यांच्या ब्रेकअपची स्टोरीही सिद्धार्थने त्याच शो मध्ये सांगितली होती. दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. काही महिन्यांतच त्यांचं ब्रेकअप झालं. पुढे आलियाचं रणबीर कपूरशी लग्न झालं, तर सिद्धार्थने दोन दिवसांपूर्वी कियाराशी लग्न केलं.
सिद्धार्थने कियारासोबत लग्न करताच आलियाने नवविवाहित दाम्पत्याला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कियारा-सिद्धार्थ तुम्ही लग्न केलंत. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा… असं म्हणत आलियाने हर्ट इमोजी वापरुन आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

सिद्धार्थने आलियाला दिलेला रिप्लाय
सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड आलियाची कमेंट पाहून कियारा अडवाणीने अभिनंदनपर पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. इंस्टास्टोरीवरील आलियाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना कियाराने लिहिलंय- ‘धन्यवाद, थँक्यू आलिया.’ यासोबतच हर्टचे दोन इमोजी कियाराने शेअर केले. आलियाची ही पोस्ट शेअर करताना सिद्धार्थने देखील इन्स्टास्टोरीवर ‘मन की बात’ व्यक्त केलीये. ‘थँक्यू आलिया’ म्हणत सिद्धार्थने आलियाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

कियाराने आलियाला दिलेला रिप्लाय