वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करोनाच्या आजारावर हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध प्रभावी असल्याचा दावा करतात. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलानेही हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषध प्रभावी असल्याचे ट्विट केल्यानंतर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने ज्युनिअर ट्रम्प यांना १२ तास ट्विट करण्यास बंदी घातली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) याआधीच हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची करोनावरील चाचणी थांबवली आहे. त्याशिवाय या औषधांमुळे हृदयविकाराचा धोका असल्याचा दावा याआधीच तज्ञांनी केला आहे. ‘बीबीसी’ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प ज्युनिअर यांनी ट्विट केलेला व्हिडिओ हा कोविड-१९ बाबत चुकीची माहिती देण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. ट्रम्प यांच्यासह काहीजणांनी हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे मलेरियावरील औषध करोनावर प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र, अद्यापही वैद्यकीय चाचण्यांमध्ये या दाव्याला पुष्टी मिळाली नाही. ट्रम्प ज्युनिअर यांना फक्त ट्विट करता येणार नाही. मात्र, अकाउंट पाहणे आणि मेसेजची सुविधा सुरू असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. याआधीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीतील मतदान आणि वर्णभेदाविरोधात सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर ट्विटरने ते ट्विट इशाऱ्यांसह हाइड केले होते.

वाचा: वाचा:

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे समर्थन केले आहे. आपण हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचे समर्थन करत असल्यामुळे आपला दावा खारीज करण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मी जेव्हा कोणत्याही गोष्टीची शिफारस करतो तेव्हा ती नाकारली जात असल्याचेही ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. आपण स्वत: १४ दिवस या औषधांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणतेच साइड इफेक्ट झाले नसल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. हायड्रोक्सीक्लोरोक्विन करोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रभावी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

वाचा:

जागतिक आरोग्य संघटनेनेही हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधाचा वापर हा करोनाबाधितांवर प्रभावी असल्याचे अद्याप सिद्ध झाले नसल्याचे म्हटले आहे. या औषधाच्या वापरामुळे हृदयविकार वाढण्याचा धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. त्याशिवाय मागील महिन्यातच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने करोनाबाधितांच्या उपचारासाठी या औषधाच्या वापराबाबत इशारा दिला आहे.

दरम्यान, जगभरात एक कोटी ६० लाखजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, सहा लाख ४४ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत करोनाने थैमान घातले असून ४१ लाख जणांना बाधा झाली आहे. तर, जवळपास एक लाख ४६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये २४ लाख ८४ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून ८८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.भारतातही करोनाबाधितांची संख्या १५ लाखांहून अधिक झाली असून ३४ हजारजणांचा मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

7 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here