अकोला : आज विदर्भाची कापूस पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या दरात किंचित वाढ झाली. तर, अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली. सध्या कापसासह तुरीची आवकही चांगली असल्याचे दिसून येत आहे. तरीही कापसाला अधिक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. शेतकऱ्यांनी अजूनही मोठ्या प्रमाणात घरातून कापूस बाहेर काढलाच नाही. आजही अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळेल या अपेक्षेने घरामध्ये कापूस साठवून ठेवला आहे. परंतु, कापसाचा दर आहे की ७ ते ८ हजार रूपयांच्या पुढे जाईना. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

काल अकोटच्या कृषी बाजारात कापसाला ८ हजार पासून ८ हजार ५७५ रूपांप्रमाणे प्रतिक्विंटल कापसाला इतका भाव होता. परंतु आज कालच्या तुलनेत कापसाच्या दरात २५ रुपयांनी वाढव होऊन हे दर ८ हजार ते ८ हजार ६०० रूपयांपर्यत पोहचले आहे. काल कापसाची आवक २ हजार २०० क्विंटल इतकी होती. आज २ हजार ५७५ क्विंटल कापसाची आवक झाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस आता हळूहळू बाजारात येतोय.

पोलीस नितीन शिंदेंचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर, मैत्रीसाठी खाकी धावली, ११ लाखांची मदत उभारली

मागील वर्षी वर्षी कापसाला १२ ते १३ हजार रुपयांपर्यत भाव होता. या तुलनेत यावर्षी बी-बियाणे अन् खताच्या किमतीत वाढ झाल्या. त्यात मशागत आणि फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमतीही वाढल्या. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल यासाठी लाखो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांनी केला. परंतु आज अपेक्षेप्रमाणे कापसाला भाव नाहीये, त्यामुळ कापसाच्या गंजी शेतकऱ्यांच्या घरा-घरात पाहायला मिळत आहेत. आतातरी सरकारने या गंभीर विषयात लक्ष घालून कापसाला योग्य भाव मिळवून द्यावा, तसेच यासाठी हालचाली सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

पत्रकार हत्या प्रकरण: संशयित आंबेरकरच्या छातीत दुखू लागलं, जिल्हा रुग्णालयात स्पेशल खोली अन् व्हीआयपी ट्रिटमेंट

अकोल्यात तुरीच्या दरात किंचित वाढ

अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल तुरीला ६ हजार १०० ते ७ हजार ६७५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव होता. तर सरासरी भाव ६ हजार ९०० रूपये इतका होता. मात्र कालच्या तुलनेत आज या तुरीच्या घरात किंचित वाढ झाली असून हे ५ हजार ५०० पासून ७ हजार ७९५ असून सरासरी भाव ६ हजार ९०० रूपयांपर्यत आहे. बाराजात २ हजार ६०१ तुरीची इतकी क्विंटल आवक झाली आहे. अन् अकोटच्या कृषी बाजारात तुरीला ६ हजार ५०० ते हजार ५८० रूपये हा कालचा भाव असून आज तुरीच्या दरात किंचित वाढ़ झाली असून हे दर ६ हजार ६०० पासून ७ हजार ६६५ रुपयांपर्यंत आहेत. तर आवक २ हजार ८९० इतकी होती.

दुसऱ्या दिवशी फक्त ही एकमेव गोष्ट केली तर भारताचा विजय पक्का, जाणून घ्या काय असेल रणनिती

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here