धुळे : शिरपूर तालुक्यात अवैध सावकारीचे जाळे वाढले असून यात शालेय व महाविद्यालयालयीन विद्यार्थी देखील अडकत चालले असल्याचे बघायला मिळत आहे. अशाच एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने व्याजाने घेतलेल्या पैशांतून होणाऱ्या दमदाटीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून या घटनेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील समर्थ नगर साईबाबा अपार्टमेंट जवळ मांडळ शिवारात राहणाऱ्या विनोद गोपीनाथ राठोड वय ४१ यांनी शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनात फिर्याद दिली असून त्यात म्हंटल आहे की, फिर्यादी विनोद राठोड यांचा १७ वर्षीय मुलगा विश्वजित विनोद राठोड याने भाग्येश शेखर भावसार, शेखर ऊर्फ विश्वास भावसार, भाग्येशची आई सर्व (रा. करवंद नाका, सुयश हॉस्पिटलच्या मागे, शिरपूर) यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. ते व्याजासह परत करावे यासाठी त्यांनी वारंवार तगादा लावला. तसेच वाढीव व्याज लावून मानसिक त्रास दिला आणि दमदाटी केली. या दमदाटीला कंटाळून मुलगा विश्वजीत याने सावळदे तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

मुंबई चकाचक; पंतप्रधानांच्या भेटीसाठी अंधेरी ते सीएसएमटीपर्यंतचा परिसर लख्ख उजळला
या फिर्यादीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी अधिनियमच्याखाली गंभीर गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. आता या संदर्भात पोलीस प्रशासन पुढे कशाप्रकारे कारवाई करतात. तसेच शिरपूर तालुक्यात अजून कोण कोण वैद्यपणे सावकारीचा व्यवसाय करतो त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचा काय कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मुंबईतील मुले अनुभवणार ‘वंदे’ भारतची सफर; १२० विद्यार्थ्यांना आज मोफत प्रवासाची मिळणार संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here