गुजरात आणि दादरा नगर हवेली मधील बुलेट ट्रेनचे १०० टक्के निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला असून बुलेट मार्ग उभारणीसाठी आवश्यक खांब उभारण्यास सुरुवात झालेली आहे. गुजरातमध्ये १४० किमी लांबीचे खांब तयार झाले आहेत.
राज्यातील बुलेट ट्रेनचे काम विविध टप्प्यात होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल बुलेट ट्रेन टर्मिनसचे ( सी १) आर्थिक निविदा खुल्या झाल्या असून संबंधित कंत्राटदाराच्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. ठाणे, विरार, बोईसर (सी-३) अंतर्गत होणार आहे. १५ मार्चला या निविदा उघडण्यात येणार आहेत. राज्यातील बुलेट आगरासाठी निविदा २२ डिसेंबर २०२२ ला मागवण्यात आल्या असून २६ एप्रिलला या निविदा खुल्या होणार आहे.
राज्यात बुलेट ट्रेनचे काम वेगाने पूर्ण होण्यासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे गुजरातप्रमाणे राज्यात देखील वेगाने प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास बुलेट ट्रेन प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आहे.