पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वेच्या ७५ वंदे भारत एक्सप्रेस धावतील असं नियोजन आखलं आहे. या ट्रेनचा जास्तीत जास्त वेग हा २०० किमी असेल. यामध्ये स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित डबे आणि फिरत्या खुर्च्या अशा सुविधा देण्यात आल्यात आहेत. ही ट्रेन जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, बायो टॉयलेट अशा हायटेक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे वंदे भारतने प्रवास केल्या थकवा येणारच नाही. यामुळे या रेल्वेसाठी अनेक राज्यांमध्ये मागणी वाढली आहे.
सध्या कुठे सुरू आहे वंदे भारत…
देशात सध्या ८ वंदे भारत एक्सप्रेस धावत असून यामध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस फेब्रुवारी २०१९मध्ये नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली. दुसरी रेल्वे दिल्ली ते माता वैष्णोदेवी कटराला धावली. यानंतर आताची वंदे एक्सप्रेस ही गेल्या वर्षी मुंबई ते अहमदाबाद धावली, चौथी वंदे भारत हिमाचल प्रदेश – दिल्ली ते उना दरम्यान धावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाचवी वंदे भारत धावली. ती म्हैसूर आणि चेन्नई दरम्यान धावली. सहावी महाराष्ट्रातील नागपूर ते छत्तीसगमधील बिलासपूर इथे धावली. सातवी हावडा ते न्यू जलपाईगुडी इथे धावली. आठवी वंदे भारत १५ जानेवारीला तेलंगणातील सिंकदराबाद इथून आंध्र प्रदेश ते विशाखापट्टणमला धावली.
२०२५ पर्यंत कुठल्या राज्यांमध्ये धावणार
दरम्यान, रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील वंदे भारत हावडा-पाटणा आणि वाराणसी-हावडा दरम्यान धावू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे २०२५ मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक वंदे भारत गाड्यांची घोषणा होऊ शकते. यामध्ये असं बोललं जात आहे की, बिहार व्यतिरिक्त झारखंड, राजस्थान, उत्तराखंड, केरळ, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये पुढे वंदे भारत धावण्याची शक्यता आहे.