न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी आता सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलचे दिवंगत CEO मार्क हर्ड यांची पत्नी पॉला हर्डशी नातं जोडलं आहे. यामुळे बिल गेट्स सध्या चर्चेत आले आहे. ६७ वर्षीय बिल गेट्स हे एक वर्षाहून अधिक काळापासून पॉला हर्डशी डेट करत होते, असं People रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पॉल हर्ड यांच्या पतीचे २०१९ मध्ये निधन झालं होतं.

‘बिल गेट्स आणि पॉला हर्ड हे डेट करत होते, हे अनेकांना माहिती आहे. पण अजून पॉला या गेट्स यांच्या मुलांना भेटलेल्या नाहीत’, असं सूत्रांनी सांगितल्याचं Peopleच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

बिल आणि पॉला हे गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनदरम्यान सोबत दिसून आले होते. त्यावेळी दोघांचे फोटोही समोर आले होते. दोघांनी सोबत बसून ऑस्ट्रेलियान ओपनमधील सामना बघितला होता.

‘त्यांना वेगळं म्हणता येणार नाही. ते एक वर्षाहून अधिक काळापासून सोबत आहेत. त्यांना (पॉला) यांना कायम एक ‘मिस्ट्री वुमन’ म्हटलं जातं. पण त्यांच्या निकटवर्तीयांसाठी त्या (पॉला) कधीच मिस्ट्री नाहीत, ते दोघी आता रोमॅन्टीक नात्यात आहेत…’, असं बिल आणि पॉलाच्या एका मित्राने सांगितलं. news.com.auने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

कॅन्सरशी दीर्घ काळ झुंज दिल्यानंतर पॉला यांचे पती मार्क यांचे २०१९ मध्ये निधन झाले होते. ते ६२ वर्षांचे होते. पॉला इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करतात. आणि एक परोपकरी म्हणून त्यांची समाजात प्रतिमा आहे. एक काळ होता त्या एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होत्या.

Gas Price : घरगुती गॅस सिलिंडर कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी संसदेत दिली माहिती
पॉला हर्ड आणि बिल गेट्स यांच्या बहुतेक मित्र हे कॉमन आहेत. आणि दोघांची भेट ही मार्क यांच्या निधनापूर्वीच झाली होती. दोघेही टेनिसचे चाहते आहेत. टेनिसच्या प्रेमातून त्यांची पहिली भेट झाल्याचं बोललं जातं. पॉला आणि मार्क यांना दोन मुली आहेत. एक कॅथरीन आणि दुसरी केली.

गृहकर्ज महागले! RBI नंतर बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका, खिशावर पडणार EMI चा भार
बिल गेट्स आणि त्यांची पूर्वीश्रमीची पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचा संसार ३० वर्षे टिकला. मे २०२१ मध्ये म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आणि ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. बिल आणि मिंडा गेट्स फाउंडेशन हे दोघी मिळवून चालवत राहतील, असं त्यांनी जाहीर केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here