मुंबई: ‘ भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होणं ही आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे. पण, ही विमाने गेमचेंजर वगैरे ठरणार नाहीत. त्यामुळं चीनची चिंता वाढेल असं मला वाटत नाही,’ असं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलं आहे. ( fighter Plane)

फ्रान्समधील कंपनीकडून राफेल ही लढाऊ विमाने खरेदी करण्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला करार मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात पूर्णत्वास गेला. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर आज ही विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सीएनएन न्यूज १८’ या वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी आपलं मत मांडलं. ‘राफेल विमानं आपल्याकडं असणं हे चांगलंच आहे, यात दुमत नाही. मात्र राफेल आल्यामुळं चुटकीसरशी आपल्या सर्व चिंता मिटतील असा जो काही समज पसरवला जातोय तो चुकीचा आहे,’ असं ते म्हणाले.

हेही वाचा:

‘भारताच्या संरक्षण सिद्धतेकडे आणि तयारीकडे गंभीरपणे पाहत असेल यात शंका नाही. मात्र, राफेल आल्यामुळं चीनची चिंता वाढेल, असं मला अजिबातच वाटत नाही. चीनची ताकद आपल्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. लष्करी ताकदीच्या बाबतीत त्यांच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही. आपल्याकडं दहा लढाऊ विमानं असतील तर त्यांच्याकडं हजार आहेत. एवढा हा फरक आहे,’ असंही पवार यांनी सांगितलं.

श्रेयवादाचा प्रश्न येतोच कुठे?
‘राफेल विमानं खरेदी करण्याचा निर्णय खूप जुना आहे. काँग्रेसनं त्यासाठी पुढाकार घेतला होता. खरेदी कराराची प्रक्रिया देखील खूप वर्षांपूर्वी सुरू झाली होती. भाजपच्या कार्यकाळात ती पूर्ण झाली. त्यामुळं यात कुणी श्रेय घेण्याचा आणि वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असंही पवार म्हणाले.

‘राफेल’ प्रकरणाचा धुरळा खाली बसेल?

राफेल विमानांच्या खरेदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलं होतं. राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा प्रमुख ठरला होता. मात्र, मोदी सरकारनं विचलित न होता हा करार पूर्ण केला आणि आता विमाने आली आहेत. त्यामुळं आतातरी राफेल घोटाळ्याचा मुद्दा निकाली निघणार का हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

13 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here