परभणी : रात्रभर चुलत बहिणीच्या लग्नाचा स्वयंपाक केल्यानंतर तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून भावाने आयुष्याची अखेर केली. ही घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील महापूर येथे घडली आहे. मात्र तरुणाने आत्महत्या नेमकी कुठल्या कारणावरुन केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घरामध्ये आनंदाचा क्षण असतानाच युवकाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनंत मुलगीर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील अनंत मुलगीर या युवकाच्या चुलत बहिणीचे लग्न होते. त्यामुळे त्याने रात्रभर बहिणीच्या लग्नाचा स्वयंपाक केला. त्यानंतर शेतामध्ये जाऊन जनावरांना पाणी पाजून येतो, असे सांगून तो सकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतात गेला. याच ठिकाणी त्याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. विशेष बाब म्हणजे बहिणीच्या लग्नाच्या दिवशी त्याने आत्महत्या केली असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा :

बैल अंगावर पडल्याने गुदमरला, मुक्या प्राण्यांना जीव लावणाऱ्या तरुणाची चटका लावणारी एक्झिट
सदरील घटनेची माहिती सोनपेठ पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तर अनंत मुलगीर याचा मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये शव विच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

आई-बाबा-शुभांगी, माफ करा; मित्रासाठी कर्ज घेतलं, पण त्याने… अंकुशच्या मृत्यूचं गूढ उकललं
या प्रकरणी अद्यापपर्यंत सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. बहिणीच्या लग्नाच्या दिवशी चुलत भावाने आत्महत्या केली असल्याने मुलगीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाहा व्हिडिओ

कोण रोहित पवार?, अजून ते मॅच्युअर नाहीत; सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीसाठी मागितल्याने प्रणिती शिंदेंची आगपाखड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here