मुंबई : मुंबईच्या मालाड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे कबड्डी खेळत असतानाच २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. याचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मालाड इथल्या महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. किर्तिकराज मल्लन (२०)असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो बीकॉमचा विद्यार्थी आहे. या घटनेनंतर त्याचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्तिक दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे. तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बीकॉम प्रथम वर्ष शिक्षण घेत होता. कार्तिकला मित्तल विद्यालयाच्यावतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कबड्डीची मॅच सुरू असतानाच कार्तिक राज या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

Crime Diary : राजेश खन्नांसोबत बोल्ड सीन्स, नंतर मुंबईतील बंगल्यात सांगाडा; कोणी केली बॉलिवूडच्या रोमान्स क्विनची हत्या?
आकाश कॉलेज विरुद्ध मित्तल कॉलेज दरम्यान कबड्डीचा सामना सुरू असताना कार्तिक मित्तल कॉलेजच्या वतीने खेळत होता. कार्तिक आकाश डेडलाईन पार करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना समोरील खेळाडूंनी त्याला पकडलं, त्यावेळी तो बाद देखील झाला होता. मात्र तो माघारी फिरत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही.

विद्यार्थ्यांनी ताबडतोब मालाड पोलिसांना या घटनेची सूचना दिली तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कार्तिकला जवळील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन गेले डॉक्टर आणि त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Vande Bharat Express: मुंबईची चांदी, राज्याला मिळाल्या ४ वंदे भारत एक्सप्रेस; वाचा कुठल्या मार्गांवर धावणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here