कळंबा येथिल शेतकरी संतोष महाले यांनी आज २० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते यासंदर्भात बोलताना ते म्हणाले दरवाढ होईल या अपेक्षेने सोयाबीन साठवून ठेवले होते. मात्र, दरात सातत्याने घट होत होती त्यामुळे चिंता वाढली होती. आता थोडा दिलासा मिळत आहे. बँकेचे कर्ज भरायचे असल्याने थोडे सोयाबीन विक्रीसाठी आणले आहे. अजून ३० क्विंटल सोयाबीन विक्रीचे बाकी आहे. त्याला किमान साडेसहा हजाराचा दर अपेक्षित आहे, असं महाले म्हणाले.
सोयाबीनच्या दरात वाढ आवक घटली
वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात आज वाढ झाल्याच दिसून आलं आहे. मात्र, कालच्या तुलनेत सोयाबीनची आवक घटली आहे. आज सोयाबीनच्या दरानं ५३०० रुपयांचा टप्पा ओलांडला असला तरी आवक घटली आहे. वाशिमच्या बाजार समितीत २०५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड बाजारसमितीत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कारंजालाडमधेय सोयाबीनला
५०२५ ते ५२४० रुपये इतका दर मिळाला. तर, ४५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांचं प्रमुख नगदी पीक म्हणून आता सोयाबीनकडे पाहिलं जातं. गेल्यावर्षी सोयाबीनला सात हजारांपेक्षा जादा दर मिळाला होता. यंदा देखील शेतकरी चांगल्या दराची वाट पाहत आहेत. सोयाबीनला साडे सहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा साठा करुन ठेवला आहे.