नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या पशु कल्याण मंडळानं १४ फेब्रुवारीला कृतज्ञता म्हणून गायीला मिठी मारा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. विभागाकडून त्यासंदर्भात एक मार्गदर्शक पत्रक जारी करण्यात आलं होतं. त्या आवाहन पत्रावर आणि निर्णयावर टीका झाल्यानंतर आज अखेर काऊ हग डे मागं घेण्यात आला आहे.

पशु कल्याण मंडळानं आज नवीन पत्रक जारी करत काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहनपत्र मागं घेत असल्याचं जाहीर केलं आहे. पशुसंवर्धन मंत्रालयाच्या सूचनेनंतर पशु कल्याण मंडळाकडून १४ फेब्रुवारीसंदर्भात जारी करण्यात आलेलं पत्रक मागं घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

पशु कल्याण मंडळाचं एक पाऊल मागं

व्हॅलेटाइन्स डे जगभर प्रेम करण्याऱ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. त्याच दिवशी भारतीय संस्कृतीचा दाखला देत पशु कल्याण मंडळानं गायीला मिठी मारण्याचं आवाहन केलं होतं. व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहन पत्रकावर सगळीकडून टीका झाल्यानंतर हा निर्णय मागं घेण्यात आला आहे.

तनुश्रीने वडिलांसोबत जायचा हट्ट केला, पहाटे पतीचा पत्नीला फोन, म्हणाला- मी तिला… पुणे हादरलं

पशु कल्याण मंडळानं जारी केलेल्या पत्रकावर देशभरातून टीका करण्यात आली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रश्न विचारले होते. अनेकांनी भारतीय संस्कृतीत दिवाळीच्या दरम्यान गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसू बारस हा सण असताना काऊ हग डेची संकल्पना का काढली असा सवाल करण्यात आला होता. आता काऊ हग डे मागं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रोहित शर्माचा पाया अन् जडेजाचा कळस, दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारतीय संघच ठरला सरस

काऊ हग डे वरुन टीकेची झोड

भारतीय संस्कृतीत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत गायीचं स्थान महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांना दूध विक्री आणि शेणखताच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत असतं. गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळीतील वसू बारस हा सण साजरा केला जातो. तर, महाराष्ट्रात बेंदूर हा सण देखील साजरा केला जातो. त्यामुळं केंद्रानं नव्यानं काढलेल्या पत्रकावर महाराष्ट्रात मोठी चर्चा घडून आली होती. अखेर केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या मंडळानं काऊ हग डे संदर्भातील आवाहन मागं घेतलं आहे.

Gadchiroli News: गडचिरोलीत शिक्षण झालेल्या मुलाला मानाचं पान, अमित शाहांचा खासगी सचिव म्हणून नियुक्ती

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here