nandurbar ugarcane tractor accident, कठडे तोडून दोन चाकं हवेत, उसाने खच्चून भरलेल्या ट्रॅक्टरचा थरकाप उडवणारा अपघात – maharashtra accident news today nandurbar sugarcane tractor wheels in air after hitting railing on tapi river bridge
नंदुरबार : तापी नदी पुलावर क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. चक्क पुलावरील कठडे तोडून ट्रॅक्टरची पुढील दोन चाकं वर हवेत गेल्याचं पाहायला मिळालं. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी अधिक क्षमतेपेक्षा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
उसाचा गाळप हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस कारखान्यावर पोहोचवला जात आहे. मात्र ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. आयन एलएलपी साखर कारखाना येथे ऊस घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या अपघात झाला आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही आहे. मात्र अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती.