मुंबई: ‘बकरी ईदला अवघे काही दिवस राहिलेत. कुर्बानीसाठी सरकारनं ऑनलाइन बकरे खरेदी करण्याची परवानगी दिली. पण बकरे घरी आणताना पोलीस लोकांना पकडताहेत. त्यांना मारताहेत. मुसलमानांवर हा अन्याय आहे. या सरकारला लोकांचे शाप लागतील,’ असा संताप समाजवादी पक्षाचे नेते यांनी व्यक्त केला आहे. (Abu Azmi attacks Thackeray Sarkar)

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’कडे त्यांनी आपली भूमिका मांडली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं बकरी ईदच्या उत्सवावर काही निर्बंध घातले आहेत. कुर्बानीवर बंदी नसली तरी बकऱ्यांचा बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदीची परवानगी दिली आहे. मात्र, ऑनलाइन खरेदी केलेले बकरे गाड्यांमधून आणताना पोलीस कारवाई करत आहेत. लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत. हजारो बकरे तडफडून मरत आहेत. हा अन्याय आहे. कुर्बानीवर थेट बंदी घातली गेली असती तर मान्य करता आलं असतं. किमान लोकांचं कोट्यवधींचं नुकसान तरी झालं नसतं. त्यांच्यावर आता आत्महत्येची वेळ आली आहे,’ अशी खंत आझमी यांनी व्यक्त केली आहे.

‘आम्ही ज्या सरकारला मदत केली, ज्यांना हार म्हणून गळ्यात घातले, तेच आता साप बनून आम्हाला चावत आहेत. प्रत्येक नियम पाळण्याची तयारी मुस्लिम समाजानं दर्शवली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची ग्वाही दिली आहे. घरात नमाज पठण होणार आहे. कुर्बानी कमीत कमी केली जाणार आहे. पण बकरे येऊच दिले जात नाहीत, तर कुर्बानी कशी होणार, असा प्रश्न आहे. कोणी आमचं ऐकायलाच तयार नाही. आठ-आठ मंत्र्यांनी जाऊन यांच्याशी चर्चा केली. त्यांचं कुठलंही उत्तर आलेलं नाही. लोकांनी पैसे जमा करून बकरे आणले होते. ते विकून मुलांची लग्न करू. शाळेची फी भरू, अशी आस हजारो लोकांनी बाळगली होती. पण या सर्वांच्या आशेवर ठाकरे सरकारनं पाणी फेरलं आहे,’ असं आझमी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

‘लोक सातत्यानं फोन करत आहेत. पण सरकारनंच बकरे येऊ न देण्याचं ठरवलं असेल तर काय करणार? सरकारची परवानगी असती आणि आरएसएस किंवा बजरंग दलवाल्यांनी अडवणूक केली असती तर आम्हाला लोकांची मदत करता आली असती. पण सरकारच ऐकत नसल्यामुळं आम्हाला कोणालाही मदत करता येत नाही. उत्तर प्रदेशच्या सरकारनंही गाय, बैल वगळता कुर्बानीला परवानगी दिली आहे. पण ठाकरे सरकारनं हद्दच केली आहे,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here