कोल्हापूर : हिंदू धर्मांमध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक मंदिरात आणि तसेच प्रत्येक देवघरात नारळ हा कोणत्या ना कोणत्या रूपात असतो. मंदिरात गेले की अनेक जण देवाला नारळ फोडत असतात. नारळ फोडताना त्यामधील पाणी हे वाया जाते. मात्र यावर कोल्हापुरातील एका प्राध्यापकाने एक उपाय शोधून काढला आहे. प्राध्यापकांनी चक्क पाणी वाचवण्यासाठी एका यंत्राची निर्मिती केली आहे. ज्यामधून पाण्यातील एक थेंब ही वाया जात नाही. कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये काम करणारे दत्तात्रय भिकाजी सुतार असे त्यांचे नाव असून केवळ ५ हजार रुपयात त्यांनी हे यंत्र तयार केले आहे.
Amol Kolhe: विमानाच्या एक्झिट डोअरजवळ फोटो, भाजपच्या ‘तेजस्वी’ खासदाराची अमोल कोल्हेंकडून खिल्ली

एक नारळ तयार होण्यासाठी कित्येक महिन्यांचा काळ लागतो. याबद्दल जसं खोबरं तयार होतं त्याप्रमाणे नैसर्गिक रित्या पाणी देखील तयार होते. या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम असे अनेक घटक असतात. डॉक्टर देखील रुग्ण आजारी असताना नारळ पाणी पिण्याचा सल्ला यामुळे रुग्णांची शारीरिक ताकद वाढवणे, शरीराला पूर्णपणे हायड्रेट ठेवणे, वजन कमी करणे असे अनेक फायदे मिळतात. हे मौल्यवान पाणी अनेक ठिकाणी वाया जाताना दिसत असते. विशेषतः मंदिरामध्ये आणि हेच पाणी वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतन येथे गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असलेले दत्तात्रय सुतार यांनी नारळपाणी संकलन मशीन बनवले आहे. विशेष म्हणजे ही मशीन केवळ पाच हजार रुपयांमध्ये त्यांनी तयार केले आहे.

सामना सुरु असताना रवींद्र जडेजा धावत मैदाबाहेर गेला, सामना थांबवला… पाहा असं घडलं तरी काय
कोणत्याही ठिकाणी ठेवता येऊ शकेल असे हे साधारणतः २ फूट उंचीचे मशीन आहे. वरच्या बाजूला नारळ वाढवण्यासाठी एक स्टीलचे बफिंग केलेला अँगल बसवण्यात आलेला आहे. त्याखाली एक ट्रे बसलवला आहे, ज्यामध्ये फोडलेल्या नारळाचे पाणी एकत्र संकलित होईल. या ट्रेला चारही कोपऱ्यांना होल करून त्यातून हे पाणी खाली ठेवण्यात आलेल्या बाटलीमध्ये साठवले जाते.हे नारळपाणी संकलन यंत्र सुतार यांनी एक प्राथमिक स्वरूपातील यंत्र म्हणून बनवले आहे. जर हे नारळ पाणी संकलन मशीन प्रत्येक मंदिरात वापरले गेले तर याद्वारे पाणी गोळा करून गरीब रुग्णांना किंवा तहानलेल्या देता येईल सोबतच परिसरातील स्वच्छ्ता ही राखले जाईल, असे सुतार यांचे म्हणणे आहे.

नरेंद्र मोदींनी ज्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली, तो दाऊदी बोहरा मुस्लीम समुदाय नेमका कोण?

1 COMMENT

  1. Does your site have a contact page? I’m having a tough time locating it but, I’d like to shoot you an e-mail.

    I’ve got some creative ideas for your blog you might be
    interested in hearing. Either way, great site and I look forward to seeing it expand over time.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here