हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओमध्ये एक विषारी साप हा बेडरुमच्या बेडवर लपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक साप घरात घुसतो, ज्याला पाहून घरातील सर्वजण बाहेर पळतात. मग, सर्पमित्रांना बोलावलं जातं. जेव्हा सर्पमित्र त्याला शोधायला जातात तेव्हा त्यांना बेडरुममधील बेडवरील गादीच्या खाली हा साप सापडतो.
पाहा व्हिडीओ –
गादीखाली भलामोठा साप
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती बेडवरील गादी उचलताच त्या गादीखाली साप लपून बसलेला दिसतो. त्यानंतर तो पलंगाखाली जाऊ लागतो. सध्या हा व्हिडिओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत.
पाहणारे आपलं घर तपासत आहेत
आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर एका खात्यावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला सोशल मीडियावर ३३ हजारांहून अधिक लाईक्स आणि ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की झोपायला जाताना काळजी घ्या. या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.