जिल्ह्यातील दिंडोरीतील पालखेड परिसरात ही कंपनी आहे. या कंपनीत एकाच वेळी ४४ कर्मचाऱ्यांचे करोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच, ही कंपनीला तात्पुरते टाळे ठोकण्यात आले आहे.
दरम्यान, करोना संकटाच्या काळात पीपीई किट आणि मास्कचा तुटवडा भासत असल्यानं सरकारनं पीपीई किट तयार करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, आवश्यक ती खरबदारी व कर्माचाऱ्यांची आरोग्याची काळजी घेऊनच काम सुरु करता येईल, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, असे आदेश असतानाही कर्माचाऱ्यांना करोनाचा संसर्ग कसा झाला? या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
कंपनीत येणापूर्वी कर्माचाऱ्यांच्या शरिराचे तापमान तपासले नव्हते का? सॅनिटायझर व मास्कचा वापर बंधनकारक केला नव्हता? तसंच, या कंपनीची तपासणी व तयार केलेल्या पीपीई किटची तपासणी होणार का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
वाचाः
दरम्यान, नाशिक शहरात करोना नियंत्रणासाठी ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ यावर भर दिला असल्याने करोना चाचण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. महापालिका हद्दीत आतापर्यंत ३३ हजार ५३१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यातून ७,९१९ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात महापालिकेच्या रुग्णालयांमधील ३,२९२ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३,६७४ करोनाबाधितांचा समावेश असून यापैकी ६,२५८ करोनाबाधित उपचाराअंती पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील आकडेवारीच्या तुलनेत नाशिक शहरातील करोना चाचण्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
I like the valuable information you provide in your articles.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.