याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ५ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास बंडू काळे हा दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी त्याची १९ वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. तुला पोलीस भरती करायचेय, काय येईल तेवढा खर्च मी करणार आहे, मला तु खुप आवडतेस,” असं म्हणत नराधम बापाने मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलीने घाबरलेल्या अवस्थेत घरातून पळ काढला. त्यावेळी तिने आई कामावर गेलेले ठिकाण गाठले.
मुलीने आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर आईने क्षणाचाही विलंब न करता मुलीसोबत हवेली पोलिस स्टेशन गाठले आणि नराधमा विरोधात तक्रार दाखल केली. आणि त्यांच्या मूळ गावी निघून गेल्या. घडलेल्या प्रकारानंतर मुलीचा बाप देखील फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र शुक्रवारी एका व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि संपूर्ण प्रकार उघड झाला.
या प्रकारात बापाने मुलीसोबत केलेला प्रकार अतिशय निंदनीय असा आहे. मुलीने व आईने दाखलेल्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अधिक तपास हवेली पोलिस करत आहेत.