अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (वय ७१), रमेश मुसळे (वय ५१), माधुरी मुसळे (वय ५०) आणि रुचिक देसाई (वय ३०) हे चौघे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पालघरला कारने जात होते. सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कर थेट दुभाजकाला धडकली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातात जखमी झालेल्या २ जणांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे आणि रुचिक देसाई या दोघांचा मृत्यू झाला. तर अशोक मुसळे आणि माधुरी मुसळे या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.