नवी दिल्ली: पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) हा आजच्या काळातील पैशाची गुंतवणूक करण्याचा एक आकर्षक आणि सोपा मार्ग बनला आहे. SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते आणि यामुळे गुंतवणूकदाराला ठराविक रक्कम म्युच्युअल फंड योजनेत नियमित अंतराने गुंतवण्याची संधी मिळते. म्हणजे SIP द्वारे एकरकमी रकमेऐवजी महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक तिमाहीत एकदा गुंतवणूक करण्याची तुम्हाला मुभा मिळते. जर तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवू शकत नसाल, तर तुम्ही SIP द्वारे छोटी-छोटी बचत करू शकता आणि काही वर्षांनी तुम्हाला एकाच वेळी खूप मोठी रक्कम मिळेल. आज आम्ही तुम्हाला अशीच एक पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही १० वर्षांच्या SIP योजनेद्वारे ५० लाखाचा फंड उभा करू शकता.

Investment Tips: दर महिन्याला ५ हजारांची गुंतवणूक करा अन् कोट्याधीश व्हा!
१० वर्षात लाखांचा फंड
आगामी १० वर्षात जर तुमहाला ५० लाखांचा फंड तयार करायचा असेल, तर सर्वात पहिले पाहा की तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायचा असलेला फंडाचा सरासरी वार्षिक परतावा किती आहे. कारण १० वर्षात ५० लाखाचा फंड तयार करणे कठीण लक्ष्य आहे आणि त्यासाठी तुमच्या गुंतवणुकीत शिस्त असणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही परिस्थितीत मासिक SIP सुरु ठेवावी लागेल. तसेच, गुंतवणूकदाराला वार्षिक स्टेप-अपचा पर्याय वापरून मासिक SIP मध्ये वाढ करावी लागेल. असे केल्या तुम्ही कमीत कमी वेळेत मोठा फंड तयार करू शकता.

गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट योजना! या म्युच्युअल फंडांनी होईल भरघोस कमाई, अल्पावधीत पैसे डबल होतील
SIP गणित समजून घ्या
१५% वार्षिक स्टेप-अप म्हणजे मासिक SIP रक्कम दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढवली आणि १२ टक्के परतावा मिळाल्यास तुम्ही १० वर्षांत ५० लाख रुपयाचा फंड जमा करू शकता. या प्रकरणात, तुम्हाला म्युच्युअल फंड रिटर्न कॅल्क्युलेटर किंवा म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार दरमहा १२ हजार ५०० रुपयाच्या गुंतवणुकीसह म्युच्युअल फंड SIP सुरु करावी लागेल.

छोटी गुंतवणूक देईल कोटींचा परतावा; म्युच्युअल फंडाच्या या नियमाने बदलेल तुमचं आयुष्य
फंडाची निवड कशी करायची?
छोटी बचत करून मोठा फंड तयार करण्यासाठी सर्वात पहिले तुमहाला योग्य फंड निवडण्याची गरज आहे. फंड निवडण्यापूर्वी लक्षात ठेवा की तो फंड तुमचे दीर्घकालीन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे की नाही. परतावा, जोखीम, तरलता (लिक्विडीटी) आणि कर कार्यक्षमतेच्या बाबतीत हा फंड तुमच्यासाठी सर्वोत्तम असला पाहिजे. जर फंड तुमची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करत नसले तर तो निरुपयोगी आहे.

(टीप: वर दिलेली माहिती SIP कॅल्क्युलेशनच्या आधारे परताव्याचा अंदाज लावला आहे. हा कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here