मुंबई: ‘व्याघ्र संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचं महत्त्व माहीत असलेले मुख्यमंत्री ज्या सरकारचं नेतृत्व करताहेत, त्या सरकारसोबत काम करत असल्याचा मला अभिमान आहे,’ अशी भावना राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्तानं व्यक्त केली आहे.

व्याघ्र दिनाच्या निमित्तानं आदित्य ठाकरे यांनी आज एकमागोमाग एक अनेक ट्वीट केले आहेत. ट्वीटमध्ये त्यांनी यांनी मुख्यमंत्री म्हणून व त्यापूर्वी देखील पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात सुरू असलेल्या मानवी हस्तक्षेपाची मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच गंभीर दखल घेतली होती. राज्यातील आणि देशभरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसोबतच मुख्यमंत्री ठामपणे उभे राहिले होते. मागील महिन्यातच त्यांनी केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं होतं. हाडाचे छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी वनसंवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. ९० आणि २००० च्या दशकात वनसंरक्षकांसाठी वैद्यकीय शिबिरं घेतली आहते. त्यांना आवश्यक ती साधनं पुरवली आहेत. आताही ते व्याघ्र संवर्धन, वन्यजीव संवर्धन व इको टुरिझमला प्रोत्साहन देणारी धोरणं राबवत आहेत,’ असं आदित्य यांनी म्हटलं आहे. ‘पर्यावरणाचे महत्त्व माहीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबत काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो,’ असंही आदित्य यांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामाचीही त्यांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनं तिल्लारीच्या वनातील ३० चौरस मीटर परिसर संवर्धित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. शाश्वत विकासावर महाविकास आघाडीच्या सरकारचा भर आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा:

व्याघ्र संवर्धनाच्या रूपानं आपली नैसर्गिक संपत्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आदित्य यांनी आजच्या व्याघ्र दिनानिमित्त आभारही मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ संदेश

‘वाघ ही वनसंपत्ती आहे. ज्या जंगलात वाघ असतो, त्या जंगलातील निसर्गचक्र हे पूर्ण मानलं जातं. त्यामुळं व्याघ्रदिन हा एका दिवसापुरती मर्यादित न राहता वाघाचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे,’ असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ‘महाराष्ट्रात बरीच वनसंपत्ती अस्तित्वात आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही संपत्ती आपण सगळे मिळून वाचवू शकलो तर ती अधिक समृद्ध होईल. त्यातून आपलं आयुष्य देखील समृद्ध होईल,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना व्याघ्रदिनाच्या शुभेच्छ्या दिल्या आहेत.

हेही वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here