petrol pump sealed, पेट्रोल पंपवर जज साहेबांनी पाहिला चमत्कार; टाकी फुल होताच डोळे पांढरे, पंप रातोरात सील – 57 litres of petrol filled in judges 50 litre car tank fuel outlet sealed in madhya pradesh
भोपाळ: मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये दुसरा पुलाजवळील पेट्रोल पंपवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. यानंतर पेट्रोल पंप सील करण्यात आला. यानंतर आता प्रशासनानं परिसरातील सर्वच पेट्रोल पंपवरील परिस्थितीचा आढावा करण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी न्यायमूर्तींची कार पेट्रोल पंपवर थांबली. न्यायमूर्तींच्या चालकानं पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्याला टाकी फुल करण्यास सांगितलं. त्यावेळी न्यायमूर्ती कारच्या मागील सीटवर बसले होते. पंपवरील कर्मचाऱ्यानं दिलेलं बिल पाहून न्यायाधीशांना धक्काच बसला. कारमध्ये ५७ लीटर पेट्रोल भरल्याचा उल्लेख बिलवर होता. त्याप्रमाणे पैसेही आकारण्यात आले होते. मात्र कारच्या इंधन टाकीची क्षमता ५० लीटरच होती. कोस्ट गार्डनं बोट रोखली; तिघांनी पार्सल समुद्रात फेकली; स्कुबा टीमच्या हाती १० कोटींचा खजिना यानंतर न्यायमूर्तींनी लगेचच स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला. प्राथमिक चौकशीनंतर प्रशासनानं पंप सील केला. यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली. परिसरातील पेट्रोल पंपांवरील परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम ही समिती करेल. दुसरा पुलजवळ असलेल्या मोखा पेट्रोल पंपवर ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत होते. आता न्यायमूर्तींनाच याचा फटका बसला. त्यामुळे पंपवर कारवाई झाली. तुझ्या गर्लफ्रेंडनं…; सेल्फी पॉईंटवर गेलेल्या तरुणाला फोन, चेहरा पडला; नको ते करून बसला रात्री उशिरा पेट्रोल पंप सील करण्यात आलं. याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला देण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायमूर्तींनी केलेल्या तक्रारीची दखल एसडीएम पी. के. सेनगुप्ता यांना केली. त्यांनी तातडीनं कारवाई करत तपास सुरू केला. कमी इंधन भरून अधिक पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी या परिसरातील अनेक पंपांवर येत असतात. त्यामुळे आता या भागातील सगळेच पंप प्रशासनाच्या रडारवर आहेत.