उदयपूर : घरात पैसे सुरक्षित नसतात म्हणून अनेकदा आपण बँकेच्या लॉकरमध्ये पैसे ठेवतो. पण एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पंजाब नॅशनल बँकेमध्ये एका महिला ग्राहकाने लॉकरमध्ये पैसे ठेवले होते. पण लॉकर उघडून पाहताच नोटांच्या जागी महिलेला फक्त मातीच दिसली. हे पाहून महिला ग्राहक प्रचंड घाबरली आणि तिने बँकेच्या कर्मचार्‍यांकडे धाव घेतली. यावेळी बँकेचे कर्मचारी आपली जबाबदारी टाळत असल्याचं समोर आलं.

खरंतर, उदयपूरमध्ये सुनीता मेहता यांनी पंजाब नॅशनल बँकेमध्ये त्यांच्या नावे लॉकर घेतलं होतं. लॉकरमध्ये २.५ लाख रुपये त्यांनी ठेवले होते. गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये त्यांनी लॉकर उघडलं असता त्यामध्ये संपूर्ण नोटा सुरक्षित होत्या. मात्र, गेल्या गुरुवारी त्यांना गरज असल्यामुळे त्यांनी लॉकर पुन्हा उघडलं आणि तिथे नोटांच्या ऐवजी फक्त आणि फक्त मातीत होती.

तुर्की भूकंपामागे अमेरिकेचा हात? विनाशकारी तंत्रज्ञान वापरून हल्ला केल्याची सोशल मीडियावर चर्चा
आता या नोटा गेल्या कुठे हे वाचून तुम्हाला धक्का बसेल. कारण या नोटांना वाळवी लागली होती. वाळवी लागून किड्यांनी या नोटा खाल्ल्या. बँक व्यवस्थापनेनं प्रेस कंट्रोल न केल्यामुळे ही रोकड गायब झाल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. लॉकरमध्ये आणखी काही सामान असून त्यामध्ये देखील वाळवी लागल्याची माहिती महिलेने दिली.

यासंदर्भात बँकेकडे तक्रारही करण्यात आली आहे. बँकेच्या आत असे २० ते २५ लॉकर आहेत. ज्यांना वाळवी लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच जर यावर तोडगा काढला असता तर लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू सुरक्षित असत्या आणि त्याला वाळवी लागली नसती. मात्र, बँकर्सच्या दुर्लक्षांमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

कबड्डी खेळताना आऊट होऊन फिरताच खाली कोसळला, मालाडमध्ये तरुणाचा मृत्यू; घटनेचा Live Video समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here