रत्नागिरी : ज्या बैलाला कायम जीव लावला, त्यानेच घात केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बैलाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडी येथे हा प्रकार घडला आहे. मारकुट्या बैलाची गावातही दहशत होती. वृद्धाने नेहमीचा शर्ट घातला नव्हता, म्हणून बैलाने त्यांना ओळखलं नसावं, असा अंदाज बांधला जात आहे.

विठोबा सखाराम घोले असे मयत ६५ वर्षीय वृद्धाचे नाव आहे. घोलेंवर त्यांच्याच बैलाने हल्ला केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पाच वाजताच्या सुमारास घडली. त्यांचा मृतदेह शुक्रवारी कासार काडीचा पऱ्या येथे आढळून आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मालक विठोबा सखाराम घुले यांनी नेहमीचा शर्ट घातला नव्हता, म्हणून बैलाने त्यांना ओळखलं नसावं. त्याच रागातून बैलाने हा हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

विठोबा घोले नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला वाड्यात आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अशी फिर्याद दापोली पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. दापोली पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे.

गुरुवारी विठोबा घोले दापोलीत आले होते, दापोलीतून पिसईला गेल्यावर त्यांचा बैल पऱ्याकडे असल्याचा त्यांना फोन आल्याने ते घरी न जाता परस्पर बैलाला वाड्यात आणण्यासाठी गेले, मात्र ते परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री शोधाशोध केली मात्र त्यांचा काही शोध लागला नाही. परंतु सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांच्या डोक्याला, मानेला व छातीवर जखमा असल्याने बैलाने त्यांच्यावर जबर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

पिसई ओझरवाडीत घोले यांच्या बैलाची मोठी दहशत असून बैल दिसल्यास ग्रामस्थ भीतीपोटी पळून जातात. गावात कोणीही त्या बैलाच्या जवळ जात नाही. तसेच कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा यापूर्वी त्या बैलाने मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या बैलाला विकून टाकण्याचा सल्ला अनेक जण देत होते. परंतु बैल चांगला आहे, म्हणून त्यांनी या बैलाला घरीच ठेवले होते.

पदयात्रेत नांदेडला आलेल्या मायलेकी बेपत्ता, तलावात काहीतरी तरंगताना दिसलं न् गूढ उकललं
घोले यांनाच हा बैल घाबरत होता. इतर कोणालाही तो जवळ येऊ द्यायचा नाही, परंतु अचानक त्याने काल मालकावरही हल्ला केल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

दोन मुलांच्या आईवर डोळा, घरमालकाचा विवाहितेवर शरीरसंबंधांना दबाव, नकार देताच डेंजर पाऊल
विठोबा घोले अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. कष्टाळू व्यक्तिमत्त्व असल्याने पंचक्रोशीत त्यांची ख्याती होती. त्यांच्या पक्षात पत्नी, मुलगा-मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या सगळ्या दुर्दैवी घटनेची नोंद दापोली पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत

कोण रोहित पवार?, अजून ते मॅच्युअर नाहीत; सोलापूर लोकसभा राष्ट्रवादीसाठी मागितल्याने प्रणिती शिंदेंची आगपाखड

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here