घरी कोणीच नसल्याची संधी प्रेयसीनं साधली. तिनं प्रियकराला फोन केला. घरी कोणीच नाही. तू मला भेटायला ये, असं प्रेयसीनं सांगितलं. प्रेयसीनं मधाळ आवाजात केलेला फोन ऐकून प्रियकर तडक निघाला. त्यानं घर गाठलं. याचा सुगावा ग्रामस्थांना लागला. प्रियकर घरात शिरताच ग्रामस्थांनी बाहेरुन दार बंद केलं आणि कुलूप लावलं.
ग्रामस्थांनी घटनेची माहिती तरुणीच्या कुटुंबीयांना दिली. दरम्यान कोणीतरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस काही वेळातच गावात दाखल झाले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. यानंतर तरुणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीनं प्रियकराला तिच्या भावोजींच्या घरी बोलावलं होतं, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक समर बहादूर यांनी दिली. ग्रामस्थांनी दोघांना घरात बंद केलं. त्यानंतर आम्ही तरुणाला ताब्यात घेतलं. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्याचं बहादूर यांनी सांगितलं.