मुंबईतील लीलावती रूग्णालयात विदेशातून डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यात यश आले नाही. शनिवारी (११ फेब्रुवारी) त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केल्याने त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातून जाहीर करण्यात आले. शेळके यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे.
स्व. सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव. होते. गुलाबराव शेळके यांचेही निधन हृदयविकारानेच झाले होते. त्यांच्यानंतर अॅड. उदय शेळके यांनी जीएस महानगर बँकची धुरा सर्थपणे सांभाळली. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली.
पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अॅड. उदय शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महानगर बँकेतील त्यांच्या कामाची पद्धत पाहूनच त्यांना ही संधी देण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम केले. एकाच वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बलाढ्य बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
आरोपीला फाशी होणारच, खासदार विनायक राऊतांचा शशिकांत वारिशेंच्या आईला शब्द