जळगाव : कलर आणण्यासाठी जळगावहून यावलकडे जात असलेल्या दोन मित्रांच्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळ हा अपघात झाला. अमोल राजेंद्र पाटील (वय २८, रा. सुप्रिम कॉलनी) याचा जागीच मृत्यू झाला तर या अपघातात जखमी असलेल्या इस्माईल हबीब तडवी (वय ३०, रा. सावखेडा सीम) याचाही रात्री साडेबारा वाजेच्या सुमारात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जळगावातील सुप्रिम कॉलनी येथे अमोल पाटील हा कुटुंबासह राहतो. शुक्रवारी सायंकाळी अमोल हा त्याचा सावखेडा सीम येथील मित्र इस्माईल हबीब तडवी याच्यासोबत एमएच १९ डीबी २७४६ या क्रमाकांच्या दुचाकीने कलर घेण्यासाठी यावल येथे जात होते. यादरम्यान यावल तालुक्यातील डांभूर्णी गावाजवळील कोळन्हावी फाट्याजवळ एमएच १९ बीडी ३४६८ या क्रमाकांच्या डंपरने अमोलच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अमोल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर इस्माईल हबीब तडवी हा गंभीर जखमी झाला.

आधी हार्ट अटॅक, नंतर ब्रेन स्ट्रोक; शरद पवारांचे विश्वासू अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन
जखमी झालेल्या इस्माईल याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात करण्यात आलं आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळाहून पसार झाला होता. या प्रकरणी मयत अमोलचे काका राजू शामराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमएच १९ बीडी ३४६८ या क्रमाकांच्या डंपरवरील चालकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं अमोल हा कुणाचा व कशासाठी कलर घेण्यासाठी जात होता? याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडे देखील नाहीय.

अमोलच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे. अमोल हा एकुलता एक मुलगा होता. अमोल याचे वडील राजेंद्र किसन पाटील हे जळगावातील मेरॅको या कंपनीत नोकरीला आहेत. तर अमोल हा सुध्दा जळगावातील एमआयडीसीत असलेल्या वेगा केमिकल्स या कंपनीत काम करुन वडिलांना घराच्या उदरनिर्वाहात हातभार लावत होता. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने राजेंद्र पाटील यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे.

जखमी इस्माईलची मृत्यूची झुंज ठरली अपयशी

डंपरच्या भिषण अपघातातील गंभीर जखमी असलेल्या इस्माईल हबीब तडवी याच्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास इस्माईल याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याची प्राणज्योत मावळली. इस्माईल हबीब तडवी हा मोलमजुरी करून आपल्या कुंटुंबाचा उदरर्निवाह करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. इस्माईलच्या मृत्यूने चिमुकलीचे पितृछत्र हरपलं आहे. दरम्यान, एकाच घटनेत दोघं मित्रांच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी जप्त डंपर जप्त केले असून चालक फरार आहे.

IND vs AUS: विजय भारताचा, चर्चा फक्त मोहम्मद शमीची; असा विक्रम केला की विराट-युवी मागे पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here