बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना देखील आज भूमिगत झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पोलिसांच्या वेशात आले आणि अंगावर राकेल घेत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाल्याने प्रशासनामध्ये एकच खळबळ निर्माण झाली. सकाळपासून जिल्हाधिकासरी कार्याल्यासमोर पोलीस अधीक्षकांसह सर्व पोलीस अधिकारी, तसेच २५० पोलीस कॉन्स्टेबल यांचा ताफा सज्ज होता. रविकांत तुपकर हे तीन दिवसापासून भूमिगत झाले होते.

विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. मध्यंतरी मुंबईच्या जलसमाधी आंदोलनाची दखल सरकारने घेतली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून पाने पुसली गेली. त्यामुळे संतापलेले रविकांत तुपकर आज आक्रमक झाले. आज ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी सरकारला आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला होता.

पती हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता व्हॅलेंटाइन वीक साजरा, पत्नीने पकडून बदड बदड बदडले
आज बुलढाणा किंवा मुंबईत रविकांत तुपकर आत्मदहन करतात की काय ? असा प्रश्न पोलीस यंत्रणेला पडला होता. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी दोन दिवसांपासून रविकांत तुपकर यांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवलेला होता. तरी देखील रविकांत तुपकरांचा थांग पत्ता पोलिसांना लागलेला नव्हता.

गौतम अदानींना सर्वात मोठा झटका; बड्या फ्रेंच कंपनीने ५० अब्ज डॉलर्सचा प्रकल्प थांबवला
गेल्या तीन दिवसापासून रविकांत तुपकर यांचा मोबाईल स्वीच ऑफ देखील होता. पोलीस त्यांचा शोध घेतच होते. मात्र आज अचानक ते पोलिसांच्या गणवेशात आले आणि अंगावर राकेल ओतून घेतले. घडलेल्या या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळपासच्या परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आपण हे आंदोलन थांबवणार नसून या दडपशाहीला दबावाखाली आपण येणार नाही. जोपर्यंत पूर्ण मागण्या मागणं होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा देखील तुपकर यांनी सरकारला दिला आहे.

अदानींच्या या कंपनीला मोठा धक्का! नफा ९६% नी घटला, मात्र शेअर बाजारात घडला चमत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here