पुणे : पाट्यांवरील सूचनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता बॅनरबाजी जोरावर असल्याचं दिसतंय. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र टिळक परिवारातील सदस्याला उमेदवारी देण्याऐवजी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे पुन्हा नाराजी पाहायला मिळत आहे. कसबा पेठेत अनोखे बॅनर लागले असून टिळकांच्या घरात उमेदवारी दिली नसल्याबद्दल पोस्टरमधून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बॅनरवर काय लिहिले आहे?

आमचेही ठरले आहे, धडा कसा शिकवायचा…
कसबा हा गाडगीळांचा
कसबा हा बापटांचा…
कसबा हा टिळकांचा
का काढला आमच्याकडून कसबा
आम्ही दाबणार नोटा

हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा पेठेत भाजपचा पारंपरिक मतदार असलेला ब्राम्हण समाज नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने कसब्यात बॅनरबाजी करण्यात आली असून या माध्यमातून ब्राम्हण समाजावर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याआधीही, ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला… टिळकांचा मतदारसंघ गेला… आता नंबर बापटांचा का ? समाज कुठवर सहन करणार ?’ अशा आशयाचे बॅनर कसब्यात लागले होते. हाच धागा पकडून हिंदू महासंघाचे आनंद दवे कसब्याच्या रिंगणात उतरले.

काँग्रेसमध्ये पटोले-थोरात मनोमिलनासाठी प्रयत्न, नगरचे पदाधिकारी घेणार पुढाकार
पिंपरी चिंचवडमध्ये जगताप कुटुंबीयांना जो न्याय देण्यात आला, तो न्याय टिळकांच्या घराला कसब्यामध्ये का देता आला नाही? पुणे जिल्ह्यात २१ आमदार असताना प्रत्येक समाजाचं चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व असताना ब्राह्मण समाजाला का डावललं गेलं? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

प्रज्ञा सातवांच्या हल्लेखोराला पश्‍चातापाचा लवलेशही नाही, म्हणतो, साहेब बकऱ्या चारायला सोडा
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरुडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाचे तिकीट कापत ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे.

आधी कोथरुडला खांदेपालट, आता टिळक कुटुंबाला डावललं, ब्राह्मण बहुसंख्यांक मतदारसंघात भाजपची अडचण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here