प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला आहे. त्यात लगुनामधील डॉल्फिन आणि मच्छिमारांचं सहजीवन, परस्पर संबंधांबद्दल तपशीलवार माहिती आहे. लगुनामधील मच्छिमार मुलेट नावाचे प्रवासी मासे पकडण्यासाठी जवळपास दीडशे वर्षांपासून डॉल्फिनची मदत घेत आहेत. ‘डॉल्फिन आणि माणसं एकमेकांच्या वर्तनावर, हालचालींवर नजर ठेऊन असतात. डॉल्फिन यांच्या सांकेतिक सूचनांनंतर मच्छिमार जाळी फेकतात. डॉल्फिन सोबतीला असल्यावर मच्छिमारांना नेहमीपेक्षा अधिक मासे मिळतात,’ असं ब्रिस्टल विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ आणि डॉल्फिन तज्ज्ञ स्टेफनी किंग यांनी सांगितलं.
लगुनाचा समुद्र किनारा नितळ नाही. इथलं पाणी गढूळ आहे. त्यामुळे मच्छिमारांना मासे नीटसे दिसत नाहीत. मात्र डॉल्फिन त्यांच्या आवाजांमधून मच्छिमारांना इशारे करतात. अधिक मासे कुठे आहेत ते डॉल्फिन्सकडून मच्छिमारांना समजतं. डॉल्फिन मुलेट माशांना किनाऱ्याजवळ ढकलतात. त्यामुळे मच्छिमारांच्या जाळ्यात अधिक मासे सापडतात. मच्छिमारांनी जाळं भिरकावल्यानंतर मासे इकडे तिकडे पळतात. या पळापळीत डॉल्फिन माशांना शिकारीची संधी मिळते. त्यामुळे माणसांसोबतच्या युतीचा डॉल्फिन माशांनादेखील फायदा होतो.
Home Maharashtra dolphin helping fisherman, VIDEO: जगावेगळी भागिदारी! डॉल्फिन्सकडून मच्छिमारांना माशांची सुपारी; पाहा अफलातून...
dolphin helping fisherman, VIDEO: जगावेगळी भागिदारी! डॉल्फिन्सकडून मच्छिमारांना माशांची सुपारी; पाहा अफलातून मासेमारी – brazilian fishermen follow instructions from wild dolphins to know where to throw their nets
रिओ दी जनेरो: ब्राझीलमध्ये डॉल्फिन आणि माणसांची अनोखी युती पाहायला मिळत आहे. डॉल्फिन आणि माणसांचे संबंध उत्तम राहिले आहेत. त्यांच्यातील मित्रत्वाच्या कहाण्या आतापर्यंत अनेकदा समोर आल्या आहेत. मच्छिमारांना डॉल्फिन मासे मदत करतात. त्यांच्या मदतीमुळे मच्छिमारांना फायदा होतो. जाळ्यात जास्त मासे सापडतात. मात्र यामधून डॉल्फिन माशांना नेमका काय फायदा होतो, या प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे.