जेव्हा समीर लग्नमंडपात कोसळला तेव्हा त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, नियतीला काही औरच मान्य होतं. त्याला मोठ्या रुग्णालयात नेत असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण मांडवात शोककळा पसरली. वधूला तर याने धक्काच बसला. ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं स्वप्न तिने पाहिलं होतं तो मांडवातच सारं अर्धवट सोडून जगातून निघून गेला. तिच्या डोळ्यातील पाणी थांबायचं नाव घेत नाहीये.
समीरचं रानीखेत येथील रहिवासी असलेल्या मुलीशा लग्न ठरलं होतं. ती तीन बहिणींमध्ये मोठी होती. शुक्रवारी रानीखेत येथील शिवमंदिरातील विवाह मंडपात त्यांच्या लग्नाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. वधू पक्ष फक्त मिरवणुकीची वाट पाहत होता. समीर हा वऱ्हाड्यांसह मांडवात पोहोचला. सगळीकडे नाच-गाणी सुरू होती. लग्नाचे विधी पार पडत होते.
वधू-वराने एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घातले, त्यानंतर मांडवात अग्निला साक्षी मानून सप्तपदीची प्रक्रिया सुरु होती. जसा सातवा फेरा पूर्ण झाला, तसाच समीरला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. काहीवेळ कोणालाही काही कळालं नाही, मांडवात एकच खळबळ माजली. त्यानंतर त्याला तात्काळ स्थानिक एसएस श्रीवास्तव रुग्णालयात नेण्यात आले.
तिथे डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि त्याला उच्च केंद्रात पाठवलं, पण तिथे नेत अशताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलं आहे. डॉक्टर समीर यांच्या मृत्यूची बातमी समजताच दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.