महासमुंद: आजकाल गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत. कधीकधी तर अशा प्रकारे गुन्हा घडवून आणला जातो ज्याचा आपण विचारही करु शकत नाही. असंच काहीसं छत्तीसगडमधील महासमुंदमध्ये घडलं आहे. येथे पोलिसांनी तब्बल १० किलो गांजा जप्त केला आहे. एका लक्झरी गाडीतून हा तस्करी केली जात होती.

दाम्पत्याला गांजाच्या अवैध तस्करीप्रकरणी अटक

याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला गांजाच्या अवैध तस्करीप्रकरणी अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याचे सांगितलं जात आहे. एसपी महासमुंद धर्मेंद सिंह चावई यांनी सांगितले की, ही कारवाई सिंगोडा पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली आहे.

साता जन्माच्या शपथा घेत असतानाच जोडीदाराचा जगाचा निरोप, मांडवातच नवरदेवाला हार्ट अटॅक
पोलिसांनी या दाम्पत्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे, असही धर्मेंद सिंह चावई यांनी सांगितले. आरोपी पती-पत्नी कोरबा येथील रहिवासी असून, संजयसिंग पावले आणि कुसुम पावले अशी या दाम्पत्याची नावं आहेत. दोघंही खरमोरा पोलीस स्टेशन रामपूर कोरबा या गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

स्कॉर्पिओ गाडीतून गांज्याची तस्करी

बुधवारी सायंकाळी उशिरा आरोपी दाम्पत्य हे स्कॉर्पिओ गाडीमधून गांजा घेऊन सिंहोडा येथे पोहोचले. रात्रीच्या अंधारात ते स्कॉर्पिओमध्ये प्रवास करून गांजा कोरबा येथे घेऊन जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. सिंगोडा पोलीस आणि सायबर सेलने दोघांनाही गण्यारी पाली चेकिंग पॉईंट येथून अटक केली.

गुप्त माहिती, पोलिसांनी धाड टाकताच असं काही सापडलं की सारेच चक्रावले
दाम्पत्याने पोलिसांशी वाद घातला

पोलिसांनी या वाहनाला थांबवलं अणि तपास करायचा असल्याचं सांगितलं. तेव्हा या दाम्पत्याने तपासात अडथळा निर्माण केला, त्यांनी पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी वाहनाची तपासणी करताच त्यांना १० किलो गांजा आढळून आला. त्यानंतर या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here