nagpur test match, ऑस्ट्रेलियाला भारताच्या शेपटानेच दिला मोठा तडाखा, विजयासाठी ठरली ही महत्वाची गोष्ट… – india vs australia nagpur test only jadeja axar and shami scored more runs than score of australia
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिली कसोटी नागपुरात खेळवली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला. भारतीय फिरकीच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू टिकू शकले नाहीत. दुसरीकडे, टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात आश्चर्यकारक कामगिरी करत ४०० धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाच्या संघाची स्थिती किती वाईट झाली याचा अंदाज केवळ भारताच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांनीच ऑस्ट्रेलियाने केलेल्या धावांपेक्षा अधिक धावा केल्या यावरून सहज लावता येतो.
रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या जोडीसमोर कांगारू संघ पहिल्या डावात टिकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांवर सर्वबाद झाला. या दोघांनी मिळून पहिल्या डावात ८ विकेट घेतल्या. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिल्या डावात दमदार ४०० धावा केल्या आणि २२३ धावांची आघाडी मिळाली. देवेंद्र फडणवीस- पंकजा मुंडेंमधील कथित मतभेद मिटले?, एकाच वाहनातून बैठकीला आल्याने चर्चा ऑस्ट्रेलियाला भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांकडून पत्करावा लागला पराभव
भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने १२० धावांची शानदार खेळी केली, पण ऑस्ट्रेलियाची खरी अवस्था टीम इंडियाच्या खालच्या फळीने केली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रवींद्र जडेजा, नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अक्षर पटेल आणि दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोहम्मद शमी यांनी कांगारू गोलंदाजांना अक्षरक्ष: झोडपून काढले.
भारत आणि नागपूर कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ खेळपट्टीवर गोंधळ घालत होता. भारत फिरकीनुसार विकेट काढत असल्याचा ऑस्ट्रेलियाचा आरोप होता, कांगारू संघ पहिल्या डावात १७७ धावांवर संपुष्टात आला होता पण त्याच खेळपट्टीवर टीम इंडियाने ४०० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून तर ८ बळी हे फिरकीपटूंनीच घेतले. पती हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत करत होता व्हॅलेंटाइन वीक साजरा, पत्नीने पकडून बदड बदड बदडले