पाटणा: बिहारच्या मुंगेरमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर एका तरुणीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल डीएसपींनी घेतली आणि तपासाचे आदेश दिले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तरुणीची आणि डॉक्टरची चौकशी करण्यात आली.

डॉक्टरचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका प्रतिष्ठित रुग्णालयातील व्हिडीओ असल्यानं सगळीकडेच त्याची चर्चा झाली. व्हायरल व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी आपण पती-पत्नी असल्याचं डॉक्टर आणि तरुणीनं सांगितलं. अनेक यूट्यूब चॅनल्सनी डॉक्टरचे व्हिडीओ शेअर केले होते. डॉक्टरनं पेशाला काळा फासल्याचं व्हिडीओतून म्हटलं गेलं होतं.
नवरदेवाची मांडवात दणक्यात एंट्री, ‘शाईन’ पाहताच सटकली; नवरीच्या भावाला धू धू धुतलं
डॉक्टर अश्लील चाळे करत असल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात होते. याचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं, अशी माहिती डीसीपी राजेश कुमार यांनी दिली. अश्लील चाळे करणारा डॉक्टर असून, जिच्यासोबत अश्लील चाळे होत आहेत, ती त्याची पत्नी आहे, असं तपासातून उघडकीस आलं. हा व्हिडीओ २ वर्षे जुना असल्याचं कुमार यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here