नाशिक : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पार पडले. यावेळी छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेस मधून निलंबित होऊन महाविकास आघाडीच्या निशाण्यावर राहिलेले आमदार सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी देखील या ठिकाणी हजर होते.

‘अरे त्या तांबेंना घ्या पुढं’

दरम्यान कार्यक्रमाच्या कोनशीला अनावरण सोहळ्याच्या प्रसंगी या ठिकाणी फोटो सेशन चालू होते. या वेळी राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार यांनी ‘अरे त्या तांबेंना घ्या पुढे’, अशी हाक मारत सूचना केली. या वेळी शरद पवार यांच्यासमोर उभ्या असलेल्या सुधीर तांबे यांनी पवारांकडे बघून हात जोडले. हे होत असताना सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे, ‘तांबेंना पुढे काढून दिलंय आम्ही सगळ्यांनी’ असे म्हणाले. कोकाटे यांचे हे वाक्य ऐकताच तेथे एकच हास्यकल्लोळ उडाला. शरद पवार यांनाही हसू आवरले नाही.

Times Litfest: भारतीय साहित्य आणि अध्यात्म हे एकमेकांपासून वेगळे नाहीत… टाइम्स ग्रुपचे व्हीसी आणि एमडी समीर जैन यांनी सादर केले संत कबीरांचे दोहे
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. आता फोटो सेशन होत असताना शरद पवार यांनी सुधीर तांबे यांचा विशेष उल्लेख करत त्यांना फोटोसाठी पुढे घेण्याच्या सूचना केल्या. यामुळे सत्यजीत तांबेंना राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा होता का ?, अशी देखील चर्चा या व्हिडीओच्या निमित्ताने आता होऊ लागली आहे.

ऑस्ट्रेलियाला भारताच्या शेपटानेच दिला मोठा तडाखा, विजयासाठी ठरली ही महत्वाची गोष्ट…
नाशिक पदवीधर मतदार संघात सुधीर तांबे यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्यानंतरही त्यांनी भरला नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांकडून त्यांना लक्ष्य केले गेले होते. त्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली. तांबे यांना भाजपने जाहीरपणे पाठिंबा दिला होता. यानंतर काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीशी आताची जवळीक पाहता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस- पंकजा मुंडेंमधील कथित मतभेद मिटले?, एकाच वाहनातून बैठकीला आल्याने चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here