अंकारा: तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारीला झालेल्या भूकंपाने संपूर्ण जग हादरलं. या भूकंपात मोठी जीवितहानी झाली. यामध्ये बेपत्ता झालेला भारतीय नागरिक शनिवारी तो राहत असलेल्या हॉटेलच्या ढिगाऱ्याखाली मृतावस्थेत आढळून आला. उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि बंगळुरू येथील एका कंपनीत काम करणारे विजय कुमार गौड कामानिमित्त तुर्कस्तानला गेले होते. भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसाप, विजय यांचा चेहरा पूर्णपणे चिरडलेला असल्याने त्यांची ओळख होणं अत्यंत कठीण झालं आहे. मात्र, त्यांच्या हातावरील ‘ओम’च्या टॅटूने त्यांनी ओखळ झाली.

विजय कुमार हे गौड पौडी जिल्ह्यातील कोटद्वारच्या पदमपूर भागात राहायाचे. तुर्कस्तानमधील त्या हॉटेलच्या ढिगाऱ्यात शुक्रवारी त्यांचे कपडे सापडले. यानंतर, तुर्कस्तानमधील भारतीय दूतावासाने शनिवारी ट्विट केले की, ‘आम्हाला हे कळवताना अत्यंत दुःख होत आहे की, ६ फेब्रुवारीच्या भूकंपानंतर तुर्कस्तानमध्ये बेपत्ता असलेले भारतीय नागरिक विजय कुमार यांच्या मृतदेहाचे काही भाग सापडले आहेत. तुर्कस्तानातील मलत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तिथे ते बिझनेस ट्रिपला गेले होते.

विजय कुमार यांची पत्नी आणि मुलगा हे गेल्या ५ दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली होते, कारण त्यांना विजय यांच्याबाबत काहीही माहिती नव्हती. त्यांच्याबाबत कुठली चांगली माहिती मिळेल अशी आशा त्यांना होती. पण, शोधमोहिमेच्या पाचव्या दिवशी अखेर त्यांना तिच बातमी मिळाली जी त्यांना नको होती. विजय यांचा मृतदेह इस्तांबूल आणि नंतर दिल्लीला नेण्यात येईल. कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की, त्यांचे पार्थिव कोटद्वारपर्यंत पोहोचण्यास तीन दिवस लागू शकतात.

दाम्पत्य लक्झरी गाडीने जात होतं, पोलिसांनी तपासासाठी अडवलं, गाडीचं दार उघडताच…
विजय कुमार यांचा मोठा भाऊ अरुण कुमार गौर यांनी सांगितले की, विजय हे ऑक्सी प्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करायचे आणि बिझनेस टूरवर गेले होते. त्यांचा भाऊ बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी भावाला फोन केले. त्यांचा फोन वाजत होता पण कोणीबी उत्तर देत नव्हते. त्यांनी ५ फेब्रुवारीला पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाशी फोनवर बोलले होते. ते अखेरचं ठरलं, त्यानंतर थेट त्यांच्या मृत्यूची बातमी आली. तुर्कस्तानमध्ये ६ फेब्रुवारीला सकाळी ज्या हॉटेलमध्ये विजय गौर राहत होते ते ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने कोसळले आणि त्यात विजय यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

साता जन्माच्या शपथा घेत असतानाच जोडीदाराचा जगाचा निरोप, मांडवातच नवरदेवाला हार्ट अटॅक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here