मुंबई: तसेच मुंबई महानगर प्रदेशातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदा मात्र संसर्गाने चाकरमान्यांच्या वाटेत विघ्ने उभी केली आहेत. अवघ्या २५ दिवसांवर आला असतानाही कोकणात कसे जायचे?, या प्रश्नाचे उत्तर चाकरमान्यांना मिळालेले नाही. सरकार पातळीवर सुरू असलेल्या गोंधळाचा मोठा मनस्ताप चाकरमान्यांना झाला आहे. ( )

वाचा:

कोकणातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. गणेशोत्सवाला दरवर्षी मुंबई व आजूबाजूच्या शहरांमधून किमान ८ ते १० लाख चाकरमानी कुटुंबकबिल्यासह कोकणातील आपल्या मूळगावी जातात. यंदा मात्र करोना साथीमुळे चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली आहे. करोनासोबतच क्वारंटाइन, वैद्यकीय तपासणी, ई-पास अशा अनेक अडचणींच्या कचाट्यात चाकरमानी अडकला आहे.

वाचा:

कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांबाबत सरकारकडून अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत मुख्यमंत्री यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. त्यात काही सूचनाही देण्यात आल्या मात्र सरकारकडून ठोस असा कोणताच निर्णय वा नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणात जायचे तर कसे?, हा प्रश्न प्रत्येक चाकरमान्याला पडला आहे.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यासोबतच एसटीकडूनही ज्यादा बस सोडल्या जातात. यंदा रेल्वेची शक्यता अगदीच धुसर असून एसटी बसबाबत मात्र आशा आहे. परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी तसे सूतोवाच केले आहेत. मुख्यमंत्र्यांची परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडल्या जाणार, असे त्यांनी म्हटले आहे.

वाचा:

नियमावलीत या आहेत अडचणी

> कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना क्वारंटाइन कालावधी १४ ऐवजी ७ दिवसांचा करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार यांनी हा मुद्दा जोरकसपणे मांडला आहे. मात्र, कोकणातील अनेक ग्रामपंचायतींचा याला विरोध आहे. संस्थात्मक वा होम क्वारंटाइनचा कालावधी १४ दिवसांचाच असावा, यावर या ग्रामपंचायती ठाम आहेत. तसे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी केले आहेत.

> १४ दिवसांच्या क्वारंटाइनची अट आयसीएमआरने घालून दिलेली आहे. केंद्राच्या अखत्यारितील हा विषय आहे. त्यामुळे हा कालावधी ७ दिवसांचा करायचा असेल तर केंद्राकडून त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. अशी परवानगी सध्याच्या घडीला मिळेल का?, हा कळीचा प्रश्न आहे.

> जे कोकणात जाणार आहेत त्यांची मुंबईतच करोना चाचणी करण्यात यावी व चाचणी निगेटिव्ह आली तर पुन्हा कोकणात जाऊन क्वारंटाइन राहण्याची अट असू नये, अशी सूचनावजा मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या मागणीला चाकरमान्यांनी उचलून धरलं असलं तरी क्वारंटाइनमधून इतकी सूट मिळण्याची शक्यता अजिबात नाही.

> मुंबईतील व्यक्ती गावी होम क्वारंटाइन राहिल्यास त्याच्यासोबत तेथील कुटुंबातील सदस्यांनाही १४ दिवस क्वांरटाइन राहण्याची अट आहे. ही अट अनेक कुटुंबांसाठी जाचक ठरत आहे.

> करोनाची स्थिती लक्षात घेऊन राज्यात अद्याप जिल्हाबंदी उठवण्यात आलेली नाही. त्यामुळेच मुंबई महानगर प्रदेशाबाहेर रत्नागिरी वा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक आहे. हा ई-पास मिळवताना चाकरमान्यांच्या नाकीनऊ येत आहेत. त्यात एजंटचा शिरकाव झाला असून त्यांच्याकडून राजरोसपणे लूट सुरू आहे. गणेशोत्सवासाठी खास बाब म्हणून ई-पासची अट शिथील केली जावी वा तो सहज उपलब्ध व्हावा, असा चाकरमान्यांचा आग्रह आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here