an ancient idol of lord krishna was found, घराचं खोदकाम सुरू, काळा दगड सापडला; बाहेर काढताच आश्चर्याचा सुखद धक्का; सर्वांनी हात जोडले – an ancient idol of lord krishna was found in brahmapuri of chandrapur
चंद्रपूर : शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होतं. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अश्मयुगाच्या खानाखुणा चंद्रपुरात सापडतात. मोर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट,चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले यांची राजवट जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत.आता नव्याने चंद्रपूरच्या इतिहासात भर पडली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच श्रीकृष्णाचे शिल्प सापडले आहे. सापडलेले शिल्प चालुक्य काळातील असून बाराव्या शतकातील आहे. खेडमक्ता येतील गजानन मानकर यांना खोदकाम करताना ही मूर्ती सापडली. त्यांनी मूर्तीला दुग्धभिषेक घातला. यावेळी प्रमोद मानकर, सचिन मेश्राम, गुरुदेव मानकर मारोती मेश्राम, गिरिधर गुरपुडे, मुकुंदा गुरपुदे, योगेश तुमडे, संदीप गुर्पुडे, केशव मानकर उपस्थित होते. मूर्ती सापडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे. Chandrapur: वाघिणीचा शॉक लागून मृत्यू, शेतकऱ्याने मृतदेह लपवला; पण अशी उघड झाली घटना असे आहे शिल्प..
सापडलेले शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्पा काळ्या दगडावर कोरलेलं आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर करंडक मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरलेलं आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकतो.
१२०० एकरात ‘गॅसिफिकेशन’; भद्रावती एमआयडीसीकडून जमीन हस्तांतरित प्रक्रिया लवकरच एक महिन्यापूर्वी ब्रह्मपुरी येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम करण्यात येत असताना शिलास्तंभ सापडला होता. मंदिर बांधकामासाठी वापरलेले कोरीव दगड आढळून आले होते. आता याच तालुक्यातील खेडमक्ता येते श्रीकृष्णाची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे ब्रह्मपुरीच्या प्राचीन इतिहासाची चर्चा रंगली आहे.