बेडकाचे तुकडे करून त्याची भाजी करणाऱ्या मुना मुंडालाच्या पत्नीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. वडिलांनी बेडकाची भाजी खाल्ली. मात्र त्यांना काहीच झालं नाही. मात्र मुलांची प्रकृती बिघडली. मुलांना नेमकं काय झालंय ते डॉक्टरांना समजत नव्हतं. अखेर वडिलांनी झालेला प्रकार कथन केला. तो ऐकून डॉक्टरांना धक्काच बसला.
डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी क्योंझरपासून ७० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या गुरुदा गावात जाऊन मुना मुंडाला (४०) अटक केली. पोलिसांनी मुनाकडे झालेल्या प्रकाराची चौकशी केली. ‘एक बेडूक सतत घरात शिरायचा. त्यामुळे मी वैतागलो होतो. गुरुवारी संध्याकाळी मी त्या बेडकाला पकडलं. त्याचे लहान लहान तुकडे केले आणि मटण करतात त्याप्रमाणे त्याला मसाला टाकून शिजवलं,’ असा घटनाक्रम मुनानं सांगितला.
मुनानं बेडकाची भाजी खाल्ली. त्याच्यासोबत त्याची दोन मुलंदेखील जेवली. त्यानंतर रात्री उशिरा मुलांना उलट्या झाल्या. ती बेशुद्ध होऊन पडली. शुक्रवारी त्यांना क्योंझर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे शुक्रवारी रात्री सुमित्राचा मृत्यू झाला. तर त्याचा मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी बामेबाडी
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.