पुणे : केंद्र सरकारने एक जानेवारीपासून मोफत धान्य योजनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात पहिल्याच महिन्यात पुण्यासह रत्नागिरी, नगर जिल्ह्यांमध्ये नागरिकांना धान्यच मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे. करारानुसार कंत्राट देतानाच हमाली ठरली असतानाही पुन्हा प्रतिक्विंटल तीन रुपयांच्या अतिरिक्त मागणीमुळे पुण्यासह नगर व रत्नागिरी जिल्ह्यांतही हे धान्य मिळालेले नाही. पुणे जिल्ह्यात जानेवारीमध्ये धान्य उचलण्यासाठी कंत्राटदारालाच सव्वाचार लाख रुपये हमालीसाठी मोजावे लागल्याची बाब पुढे आली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जानेवारीपासून मोफत धान्य देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे धान्य भारतीय खाद्य महामंडळांच्या गोदामांमधून उचलेले जाते. पुणे जिल्ह्यात महिन्याला १४ हजार टन गहू आणि तांदळाचे वितरण केले जाते. कोरेगाव पार्क आणि फुरसुंगी येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामांतून हे धान्य उचलण्यात येते. बारामतीतील अन्य दोन गोदामांतून जवळच्या तालुक्यांसाठी धान्य उचलले जाते. जिल्ह्यातील सुमारे २२ लाख ४३ हजार लाभार्थ्यांसाठी १४ हजार टन एवढे धान्य लागते. भारतीय खाद्य महामंडळाशी झालेल्या करारानुसार महामंडळाकडून हे धान्य जिल्ह्यात वितरित करण्यात येते. धान्याची पोती ट्रकमध्ये टाकण्यासाठी हमालांकडून प्रतिक्विंटल तीन रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात येत आहे. ही अतिरिक्त मागणी असल्याचे सांगण्यात येत असून त्याचा फटका पुणे जिल्ह्यास राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात फेब्रुवारी महिन्याचे ७५ टक्के धान्य उचलण्यात आले असून सोमवारपासून त्याचे वाटप सुरू होईल. उर्वरीत धान्याची उचल फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी सांगितले.

Sanjay Raut: भगतसिंह कोश्यारी भाजपचे एजंट होते, राजीनामा मंजूर करुन भाजपने उपकार केले नाहीत: संजय राऊत

कंत्राटदाराला भुर्दंड

अतिरिक्त हमालाची रक्कम मिळाल्याशिवीय ट्रकमध्ये धान्य चढवणार नाही अशी आठमुठी भूमिका हमालांनी घेतली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील धान्य जानेवारीमध्ये वेळेवर उचलले गेले नाही. त्यामुळेच पुणे, नगर, रत्नागिरी तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये जानेवारी मोफत धान्य मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना उपाशी पोटी राहावे लागले. हमाली देता येणार नाही अशी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतली. त्यामुळे हा तिढा आणखी वाढला. अखेर या कंत्राटदाराने १४ हजार टन धान्य उचलण्यासाठी हमालांना सुमारे चार लाख २० हजार रुपये दिले. त्यानंतर हे धान्य उचलण्यास सुरुवात झाली असून येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत धान्य सर्व तालुक्यांमधील रेशन दुकानांमध्ये पोहोण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here