मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये रविवारी सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह गोणीत सापडला. महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एकामध्ये एक व्यक्ती खांद्यावर गोणी घेऊन फिरत असताना दिसला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

घटना खरखौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जमुना नगरची आहे. रविवारी सकाळी लोकांना एक गोणी पडलेली दिसली. बराचवेळी कोणीच गोणी घेऊन जात नसल्यानं स्थानिकांना संशय आला. त्यांनी गोणी उघडून पाहिली. त्यात एका महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत होता. मृतदेह पाहून स्थानिकांना धक्काच बसला. परिसरात ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली. त्यामुळे लोकांची घाबरगुंडी उडाली. मृतदेह पाहिलेल्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
बेडूक घरात घुसल्यानं संतापला; तुकडे करुन शिजवले, पोरांना खाऊ घालून झोपला अन् त्याच रात्री…
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचं वय ३० च्या आसपास आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास हाती घेत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती खांद्यावर गोणी घेऊन फिरत असलेला दिसला. त्यानं अनेक ठिकाणी गोणी फेकण्याचा प्रयत्न केला.
अस्वस्थ वाटू लागलं, ECG नॉर्मल; तासाभरात तरुणाचा मृत्यू; १२ दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा
अखेर जमुना नगरमध्ये गॅस गोदामाजवळील गल्लीशेजारी त्यानं गोणी टाकली आणि तिथून निघून गेला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती क्षेत्राधिकारी रुपाली राय यांनी दिली. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. सीसीटीव्हीचा आधार घेत आरोपीचाही शोध घेतला जात आहे. गोणीत विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here