क्विटो: चीनचे आक्रमक विस्तारवादी धोरण आता जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू असल्याचे चित्र आहे. चीनपासून जवळपास १५ हजार किमी दूर असलेल्या दक्षिण अमेरिकेच्या एका देशाच्या बेटाभोवती २६० चिनी मच्छिमारांच्या नौका दिसून आल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने चिनी नौका दिसल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील देशही सतर्क झाले आहेत.

दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर देशाच्या गॅलपागोस बेटांभोवती 260 चिनी मासेमारी करणाऱ्या नौका दिसून आल्या. चीनपासून या भागाचे अंतर सुमारे १५ हजार किलोमीटर आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे इक्वाडोरचे संरक्षण मंत्री ओसवाल्डो जेरिन यांनी सांगितले की, चिनी मच्छिमारांचे जहाज यावेळी आंतरराष्ट्रीय समुद्री क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येणार नाही. तर, दुसरीकडे इक्वाडोरच्या नौसेनेने गॅलपागोस बेटाच्या भोवती आपली गस्त वाढवली आहे. या बेटांजवळ चिनी जहाज पोहचल्यास बेटाजवळ असणाऱ्या सागरी जीवनाची हानी होण्याची शक्यता आहे.

वाचा: वाचा:

इक्वाडोरचे राष्ट्रपती लेनिन मोरेना यांनी एक आठवडा आधी ट्विट करून या ऐतिहासिक बेटाच्या संरक्षणासाठी प्रतिबद्धता जाहीर केली होती. त्यानंतर इक्वाडोरच्या नौदलाने गॅलपागोस बेटांपासून २०० मैल अंतरावर २६० नौका दिसून आल्याचे सांगितले. या चिनी मच्छिमारांच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेता इक्वाडोर सतर्क झाला आहे.

वाचा:

गॅलपागोस बेट हे समुद्री जैवविविधतेसाठी ओळखले जाते. येथील मोठ्या आकाराचे कासवे जगभरात आर्कषणाचे केंद्रबिंदू आहेत. त्याशिवाय, या बेट समूहांवर राजहंस आणि अल्बाट्रोसच्या अनेक प्रजाती आहेत. मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला सिद्धांतही या ठिकाणाहून प्रेरीत असल्याचे म्हटले जाते.

वाचा:

याआधीदेखील गॅलपागोस बेटाजवळून २०१७ मध्ये एक चिनी जहाज ताब्यात घेण्यात आले होते. समुद्री मार्ग चुकल्याने हे जहाज या ठिकाणी आले असल्याचे म्हटले जात होते. या जहाजाची तपासणी केल्यानंतर जहाजावर ३०० टन सागरी वन्यजीव आढळले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here