टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पंड्या सध्या ब्रेकवर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करण्याच्या तयारीत आहे. हार्दिक पांड्याने २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकसोबत कोर्ट मॅरेज केले होते. हे जोडपं अगस्त्य या मुलाचे पालकही आहेत.
अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक पुन्हा एकमेकांशी लग्न करणार आहेत. ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, हे जोडपे १४ फेब्रुवारीला उदयपूरमध्ये एका भव्य समारंभात लग्नबंधनात अडकणार आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा विवाह सोहळा १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून १६ तारखेपर्यंत चालणार आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी कोरोना काळात लग्न केले होते. तेव्हा ज्यादा गाजावाजा न करता त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. मात्र मोठं लग्न करावं, सगळ्या पै पाहुण्यांना, आप्तेष्टांना बोलावावं, अशी त्यांच्या मनात इच्छा होती. त्यांच्या मनात भव्य लग्नाची कल्पनाही होती. त्यांची आता हीच इच्छा ते पूर्ण करणार आहेत. या कार्यक्रमात हळद, मेहंदी आणि संगीत कार्यक्रम असणार आहे. या लग्नाची तयारी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होती.
कोण आहे हार्दिकची पत्नी नताशा?
- नताशा स्टॅनकोविक एक बॉलिवूड अभिनेत्री आहे
- २०१४ मध्ये बिग बॉसच्या सीझन ८ मध्ये तिचा सहभाग
- नताशाने सत्याग्रह, डॅडी आणि फुकरे रिटर्न्समध्ये काम केलंय
- २०१८ मध्ये नताशा शाहरुख खानच्या झिरोमध्ये छोट्या भूमिकेत दिसली
- २०१९ मध्ये नताशाने ऋषी कपूर आणि इमरान हाश्मीच्या द बॉडीमध्ये आयटम नंबर केला
- नताशाची हॉटनेस आणि ग्लॅमरसाठी खास ओळख