house slab collapsed two dead in bhandup west, मुंबईत मोठी दुर्घटना, दुरुस्तीचे काम सुरू असताना घराचा स्लॅब कोसळला; दोघांचा दुर्दैवी मृत्यू – house slab collapsed in khindipada bhandup west two dead
मुंबई : भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात आज सकाळी मोठी घटना घडली. घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या तरुणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. घटने
मुंबई अग्निशमन दलाला सकाळी ९.४२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. ही माहिती मिळाताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली. भांडुप पश्चिमेला असलेल्या खिंडीपाडामध्ये ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चरच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी ही घटना घडली. स्लॅबचा काही भाग दोन तरुणांवर कोसळला, अशी माहिती आहे. राजकुमार राम सहाय (वय २१) आणि रामावतार अर्जुन यादव (वय १८) हे दोन तरुण घटनेत गंभीर जखमी झाले. या जखमींना जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात नेले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती मुंबी महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या संदर्भात भांडुप पोलिसांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नांदेडच्या महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचंय पुरुष, याचिका करत हायकोर्टात धाव