अपघातात मोहेगावातील तिघांचा मृत्यू
या भीषण अपघातात गंभीर जखमी राम मलखंब राठोड (वय २६ वर्षे) याच्यावर बुलढाणा येथील एक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात जागीच ठार झालेले तिघेजण हे मोहेगाव येथील रहिवासी आहेत. गावातील तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
एकीकडे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग सुसाट झाल्यानंतर तिथे अनेक अपघात घडत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. तर मुंबई-नागपूर महामार्ग क्रमांक सहावर अपघात झाल्याने जिल्ह्यात आता समृद्धी महामार्गाच्या पाठोपाठ आता मुंबई-नागपूर महामार्गांवर देखील वाहनांचा वेग नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.