मुंबईः राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी करोना रुग्णांचा वाढत्या रुग्णसंख्येचा आकडा अजूनही काळजी वाढवणारा आहे. २४ तासांत ९ हजार २११ नवीन रुग्णांची नोंद झाल्यानं आज राज्यातील रुग्णसंख्येनं चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यात १० हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली होती. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी रुग्णसंख्या ठरली होती. तर राज्याचा रिकव्हरी रेटही वाढला होता. त्यामुळं महाराष्ट्र करोनाचा विळख्यातून बाहेर पडत असल्याचं चित्र होतं. मात्र, आज करोना रुग्णांच्या संख्येनं चार लाखांचा टप्पा पार केल्यानं आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी अधिक वाढली आहे. दिवसभरात २९८ जणांचा मृत्यू करोनामुळं झाला असून एकूण मृतांची संख्या १४ हजार ४६३ इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यूदरही ३. ६१ टक्के इतका आहे.

वाचाः

आज एकूण ७ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २ लाख ३९ हजार ७५५ करोनाबाधित रुग्णांनी करोनाची लढाऊ जिंकली आहे. राज्यातील रिकव्हरी रेटही ५९.८४ टक्के इतका आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार १२९ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २० लाख १६ हजार २३४ चाचण्यांपैकी ४ लाख ६५१ (१९.८७ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ८ लाख ८८ हजार ६२३ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर, ४० हजार ७७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत ८५ हजार रुग्ण बरे

मुंबईत २८ जुलैपर्यंत करोना रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला असून यातील तब्बल ८५ हजार ३२७ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत फक्त २० हजार १२३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. धारावी, दादर, माहीम हा भाग पालिकेच्या जी उत्तर विभागात येतो. या विभागात आज एकूण ५ हजार ८९१ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यात ४ हजार ७४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here