मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उत्तर भारतीय नागरिकांशी संवाद मेळावा गोरेगावमध्ये पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मन की बातवरुन टोला लगावला आहे. उत्तर भारतीयांशी सेनेचं नातं मजबूत करण्यासाठी मी आलो, असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उत्तर भारतीयांचा मेळावा नसू ही बैठक आहे. मेळाव्याला मैदान कमी पडेल, असं ठाकरे म्हणाले. लोकांना आता मन की बात नको असून दिल की बात हवीय, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.

संपूर्ण देशाला भाजपचं हिंदुत्व काय हे समजून घ्यायचं आहे. आम्ही भाजपशी २५-३० वर्ष राजकीय मैत्री निभावली, पण आम्हाला काय मिळालं. भाजपवाले केंद्रात सत्तेत बसल्यावर त्यांना ज्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं मग अकाली दल असो आणि शिवसेना त्यांना नकोसे झाले.भाजपचे वाईट दिवस होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना वाचवलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी जो देशद्रोही असेल मग कोणत्याही धर्माचा असेल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे असा विचार मांडला. आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदुत्व सोडलेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका देखील केली.

आम्हाला काँग्रेससोबत जाण्यास प्रवृत्त करण्यात आलं. आज काही जण गळ्यात पट्टा घालून काही जण गुलामगिरी करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे शिकवलेलं नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, त्यांनी जे केलं ते जर मी केलं असतं तर हिंदुत्व सोडलं असल्याचा आरोप केला असता. मुंबईतील बोहरा समजाचे लोक शिवसेनेसोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

१९९२-९३ च्या वेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते त्यावेळी मराठी गैरमराठी असं केलं नव्हतं. करोनाच्या संकटाच्या काळात हिंदू मुस्लीम, मराठी अमराठी असा भेद केला नाही. शिवसैनिकांनी रक्तदान केलं, माणुसकी दाखवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पाच वर्षात आपण सगळे एकत्र असतो मग निवडणुकीच्यावेळी वेगळे का होतो, असा सवाल ठाकरे यांनी केली.

बाळूमामांच्या मेंढ्यांच्या कळपात भरधाव स्विफ्ट घुसली, १२ ते १५ मेंढ्या जागीच ठार; नाशकातील घटना

लोकांना एकमेकांमध्ये लढवत ठेवण्याचं यांचं काम सुरु आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आपल्याला ज्या मार्गानं हे घेऊन निघाले आहेत त्यातून देशाची बदनामी होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिराचा विषय चर्चेत नव्हता, मात्र आम्ही राम मंदिरासाठी विशेष कायदा करण्याची मागणी केली होती. आम्ही २०१८ मध्ये अयोध्येला गेलो, शरयू नदीच्या काठावर आरती देखील केली होती. अयोध्येत जाण्यापूर्वी शिवनेरीवर जाऊन आलो. शिवजन्मभूमीतील माती घेऊन राम जन्मभूमीत गेलो होतो. त्यानंतर राम मंदिराचा प्रश्न सुटला. हिंदूंना जागवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. देशावर प्रेम करणारे मुस्लीम देखील आपल्या सोबत आले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

प्रणितींना विरोध, काँग्रेस कार्यालयात घोषणाबाजी, रोहित पवारांचं समर्थन करणाऱ्या NCP पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

आज आपण सुरुवात केली आहे, पुढे आणखी बैठका होतील. त्यानंतर आपली सभा होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्यात, मैदानात समोर या असं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंमत नसून हिंदूंचा नेता मानतात असं कसं होऊ शकतं, असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय’; गिरीश बापट यांचा एकनाथ शिंदेंना ‘विजयाचा’ शब्द, मविआचं टेन्शन वाढणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here