म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा नांदेडचे प्राचार्य स. दि. महाजन यांना जाहीर झाला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील अध्यक्षस्थानी होते. बैठकीला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, कार्यवाह डॉ. दादा गोरे, डॉ. हेमलता पाटील, डॉ. संजीवनी तडेगावकर, रामभाऊ तिरुके, देविदास फुलारी, संतोष तांबे, मोहन कुलकर्णी, सुरेश सावंत, विलास सिंदगीकर, डॉ. दिलीप बिरुटे आदी उपस्थित होते.

Amazon, Flipkart ला दणका, सरकारने पाठवली नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीत लक्षणीय कार्य केलेल्या साहित्यिकास किंवा कार्यकर्त्यास त्याच्या कार्याचा गौरव म्हणून परिषदेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. आजवर डॉ. सुधीर रसाळ, ना. धों. महानोर, डॉ. चंद्रकांत पाटील, न्या. नरेंद्र चपळगावकर, प्रा. तु. शं. कुलकर्णी, प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना हा पुरस्कार मिळाला आहे. २०२३ च्या पुरस्कारासाठी प्राचार्य स. दि. महाजन यांची निवड केली.

रविवार ठरला घातवार, भीषण अपघातात एकाच गावातील तिघांचा जागीच मृत्यू, वाहनाचा झाला चुराडा
महाजन २८ वर्षे मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य व अनेक वर्षे कार्यकारिणी सदस्य, काही वर्षे साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष होते. विश्वकोश निर्मिती मंडळ, दर्शिका संपादक मंडळ यावर त्यांनी काम केले. नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. पुरस्काराचे स्वरुप पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे आहे. चार किंवा पाच मार्च रोजी नांदेड येथे महाजन यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

VIDEO: बदलापूर एमआयडीसीत भीषण आग, संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक, काही कामगार जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here