पुणे : नृत्य करताना वादग्रस्त हावभावांमुळे सतत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या नर्तिका गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, अशी तंबीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तिला आपल्या मंचावर नृत्यासाठी कुणीही बोलावू नये, अशी ताकीदच अजित पवार यांनी दिली. आता अजितदादांच्या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली आहे.

राष्ट्रवादीने गौतमी पाटीलच्या नृत्यावर बंदी घातल्यानंतर खुद्द गौतमीनेच पुढे येऊन प्रतिक्रिया दिलीये. याआधी माझ्याकडून काही चुका झाल्या. मात्र लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासून माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी अश्चील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असं गौतमीने म्हटलं आहे.

दादा मला माफ करा

अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. पण अजूनही काही लोक मला ट्रोल करतायेत. ते कोण लोक आहेत, हे मला माहिती नाही. माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही? असा सवालही गौतमीने विचारला.

अजितदादा म्हणाले, आपल्या मंचावर तिला एन्ट्री नको, पुण्यात गौतमीला परवानगी नाकारली!
एवढ्या दिवस मी शांत होते… जाऊदे म्हणत होते पण आता…..

एवढ्या दिवस मी शांत होते… जाऊदे म्हणत होते… कुणीकाही बोललं तर मी उत्तर देत नसायचे. पण कदाचित माझी वाढती लोकप्रियता त्यांच्या डोळ्यात खुपत असेल. माझे काही जुने व्हिडीओ लोक सोशल मीडियावर पोस्ट करतात. मग मला खडसावताना हे ही सांगायला हवं की जुने व्हिडीओ टाकू नका, असा टोलाही गौतमीने अजितदादांना लगावला.

गौतमी पाटील विरुद्ध राष्ट्रवादी

राज्यात लावण्यांच्या नावाखाली अश्लील डान्सचे प्रकार होतायेत. आयोजनात राष्ट्रवादीच्या पदाधिकारीच आघाडीवर असतात, अशी तक्रार राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलच्या पदाधिकारी लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेताना असे कार्यक्रम आयोजित न करण्याच्या तात्काळ सूचना अजित पवार यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here