हा कॅच कुणी घेतला?
भारतात पावसाळा सोडला तर इतर कालावधीमध्ये ग्रामीण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर क्रिकेटच्या विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. बेळगावातील डेपो मैदानावर श्री चषक २०२३ ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या लढतीमधील हा व्हिडिओ आहे. श्री चषक २०२३ या स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना एसआरएस हिंदुस्थान आणि साईराज वॉरिअर्स या संघांमध्ये सुरु होता. या मॅचमध्ये बॅटसमननं जोरदार फटका लगावला होता. एका क्षणाला तो फटका षटकार असेल असं अनेकांना वाटलं. पण, सीमारेषेवर वेगळचं घडलं.
किरण तरळेकरच्या कॅचची दखल
सीमा रेषेवर किरण तरळेकर हा खेळाडून फिल्डींग करत होता. किरण तरळेकरनं हवेत झेपावत कॅच घेतला. किरणनं पुढं सीमा रेषेबाहेर तोल जाणार हे लक्षात येताच हवेत फेकला. सीमारेषेच्या आतमध्ये असताना हवेत उडी मारत किरणनं तो चेंडू पायानं हवेत पुन्हा उडवला आणि पुढे दुसऱ्या सहकाऱ्यानं तो कॅच घेतला.
बेळगावातील श्री चषक २०२३ चा सामन्यात अप्रतिम झेल घेणाऱ्या करिण तरळेकरच्या कामगिरीची दखल चक्क क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतली आहे. सचिननं किरणचं कौतुक करताना या खेळाडूला नक्कीचं फुटबॉलची देखील माहिती असणार असं म्हटलं आहे. तर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी देखील किरण तरळेकरचं कौतुक केलं आहे. किरण तरळेकरनं अफलातून कॅच घेतला असून क्रिकेटमध्ये त्याला चांगला भविष्य असून लवकरचं भेटू असं ट्विट करत कौतुक केलं आहे.